झायडसच्या ‘विराफिन’ औषधास परवानगी; सात दिवसांत कोरोना रुग्ण निगेटिव्ह होण्याचा दावा

Zydus Cadila - Virafin

नवी दिल्ली : गेले वर्षभर कोरोनाशी (Corona) लढा दिल्यानंतर या लढ्यातील सर्वांत मोठं शस्त्र कोरोना लस आली आणि आता आणखी एक शस्त्र कोरोनाचा खात्मा करायला तयार झालं आहे. आता झायडस कॅडिलानं तयार केलेल्या कोरोनावरील औषधाच्या वापरास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (डीजीसीआय) (DCGI) मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच झायडस कॅडिला कंपनीच्या (Zydus Cadila) विराफिन (Virafin) औषधाच्या वापराला सुरुवात होणार आहे.

सध्या देशात दोन लसींचा वापर सुरू आहे. कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं ठरत आहे. तर विराफिनचा वापर कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये करता येणार आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर विराफिनच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून हाती आलेले निष्कर्ष उत्तम आहेत. विराफिन ही दवा सौम्य लक्षणे असलेल्या १८ वर्षांवरील व्यक्तींवर परिणामकारक ठरली आहे. अवघ्या सात दिवसांत ९१.१५ टक्के रुग्णांचे आरटी-पीसीआर अहवाल निगेटिव्ह येत असल्याचा दावा झायडसनं केला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना लवकर बरे करण्यात आणि ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगानं कमी करण्यात विराफिन उपयोगी ठरेल.

कोरोना रुग्णांना सुरुवातीच्या कालावधीत विराफिन दिलं गेल्यास रुग्ण अधिक लवकर बरा होतो. त्याला होणारा त्रासदेखील कमी होतो, असा दावा झायडस कॅडिला कंपनीने केला आहे. हे औषध केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानं देण्यात येईल. ते सुरुवातीला केवळ रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button