झोमॅटो रायडर्सचा पगार वाढवणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे ८०० रुपयांचा फटका!

Zomato

नवी दिल्ली :- पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. विशेषत: डिलिव्हरी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांना मोठे नुकसान झाले आहे. फूड डिलिव्हरीमध्ये अग्रेसर असलेली झोमॅटो कंपनी अडचणीत आली आहे. त्यामुळे कंपनीने रायडर्सच्या पगारवाढीची घोषणा केली आहे.

गेल्या १० दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या दरवाढीमुळे झोमॅटो कंपनीला कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय घ्यावा लागला. दिल्लीत पेट्रोलची किंमत ९०.९३ रुपये आहे, तर डिझेलची किंमत ८१.३२ रुपये आहे. त्याचबरोबर मुंबईतील पेट्रोलची किंमत ९७.३४ रुपये आहे, तर डिझेलची किंमत ८८.४४ रुपये आहे.

झोमॅटोचे चालक दिवसातून १०० ते २०० किमी प्रवास करतात. अशा परिस्थितीत प्रत्येक चालकावर पेट्रोलवर दरमहा ८०० रुपये खर्च करावा लागतो. त्यामुळे रायडर्सच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर रायडर्सचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल. झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित सरदाना यांनी सांगितले की, “तेलाच्या वाढत्या किमतींचा उत्पन्नावर कसा परिणाम होतो, याची आम्हाला जाणीव आहे. अशा परिस्थितीत आम्ही आमच्या डिलिव्हर पार्टनर्सच्या पगारामध्ये ७ ते ८ टक्क्यांनी वाढ करणार आहे. यापूर्वी देशातील ४० शहरांमध्ये ही घोषणा केली. येत्या आठवड्यात इतर शहरांमध्येही पगारवाढ लागू करू.”

पगारवाढीनंतरही रायडर्स नाराज
झोमॅटोने पगारवाढीच्या निर्णयाची घोषणा केली आहे. या निर्णयावर रायडर्स खूश नाहीत. ज्या प्रमाणात इंधनाचे दर वाढले आहेत, याचा विचार करून कंपनीने पगार वाढवावा. प्रत्येक शहरानुसार रायडर्सला वेगवेगळे पैसे मिळतील. कंपनीत अनेक वर्षे सेवा केल्याचाही पगारवाढ लागू करताना विचार करण्यात यावा, असे मत रायडर्सनी व्यक्त केले आहे. पेट्रोलवर खूप खर्च करावा लागतो आणि कोरोना महामारीमुळे ऑर्डरदेखील कमी आहेत. अशा परिस्थितीत कुटुंब सांभाळणे अडचणीत येत आहे. त्यामुळे कंपनीने पुरेशी पगारवाढ करावी, अशी मागणी रायडर्सकडून होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER