तटस्थ कसोटींच्या क्लबमध्ये आता झिम्बाब्वे सामील, केवळ भारत व बांगलादेश बाकी

zimbabwe joins neutral test Teams

झिम्बाब्वे आणि अफगणिस्तान (Zimbabwe Vs Afghanistan) दरम्यानचा अबुधाबी (Abu dhabi) येथे मंगळवारी सुरू झालेला कसोटी सामना वैशिष्ट्यपूर्ण आहे तो यासाठी की झिम्बाब्वेचा तटस्थ स्थळी (Neutral Venue) हा पहिलाच कसोटी सामना आहे. यासह तटस्थ स्थळी कसोटी सामने खेळणाऱ्या संघांची संख्या आता 10 झाली असून आता केवळ भारत (India) आणि बांगलादेश (Bangla desh) हे दोनच असे संघ आहेत जे आतापर्यंत तटस्थ स्थळी एकही कसोटी सामना खेळलेले नाहीत. या यादीत भारतही लवकरच येण्याची शक्यता आहे. कसोटी क्रिकेटच्या वर्ल्ड चॕम्पियनशीप अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ पात्र ठरला तर आपला हा पहिला न्यूट्रल कसोटी सामना असेल कारण हा सामना लंडनच्या लॉर्डस् मैदानावर खेळला जाणार आहे आणि इंग्लंडचा संघ या अंतिम सामन्यासाठी नसेल हे आधीच स्पष्ट झाले आहे.

कसोटी सामन्यांसाठी तटस्थ स्थळे ही पाकिस्तानात श्रीलंकन संघावर झालेल्या बॉम्बहल्ल्यानंतर पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद झाल्यानंतरची काॕमन गोष्ट झाली असली तरी हा प्रयोग फार पूर्वीपासूनचा आहे म्हणजे 108 वर्षांपूर्वीपासूनचा आहे. 1912 मध्ये इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यांची तिरंगी मालिका खेळली गेली होती त्यावेळी मँचेस्टरला खेळले गेलेले ऑस्ट्रेलिया विरुध्द दक्षिण आफ्रिका हा पहिला तटस्थ कसोटी सामना होता.

प्रत्येक संघाचे पहिले न्यूट्रल कसोटी सामने
आॕस्ट्रेलिया – वि. द. आफ्रिका- मँचेस्टर 1912
द.आफ्रिका – वि. ऑस्ट्रेलिया- मँचेस्टर 1912
पाकिस्तान – वि. श्रीलंका- ढाका 1999
श्रीलंका – वि. पाकिस्तान- ढाका 1999
वेस्ट इंडिज – वि. पाकिस्तान- शारजा 2002
इंग्लंड – वि. पाकिस्तान- दुबई 2012
न्यूझीलंड – वि. पाकिस्तान – अबुधाबी 2014
अफगणिस्तान – वि. आयर्लंड – देहराडून 2019
आयर्लंड – वि. अफगणिस्तान – देहराडून 2019
झिम्बाब्वे – वि. अफगणिस्तान – अबुधाबी 2021

आतापर्यंत खेळले गेलेले तटस्थ कसोटी सामने (संघ-सामने- विजय- पराभव याक्रमाने)
पाकिस्तान- 39 – 19 – 12
ऑस्ट्रेलिया- 12 – 06 – 04
न्यूझीलंड— 06 – 03 – 02
श्रीलंका—– 09 – 03 – 03
वेस्ट इंडिज- 06 – 02 – 04
अफगणिस्तान- 02 – 01 – 01
द.आफ्रिका- 07 – 01 – 03
इंग्लंड ——- 06 – 00 – 05
आयर्लंड —- 01 – 00 – 01

तटस्थ स्थळी सामने खेळण्याबाबत पाकिस्तान व ऑस्ट्रेलियादरम्यान अमिराती, इंग्लंड व श्रीलंकेत सामने झाले आहेत हे विशेष. अमिराती हे तर पाकिस्तानचे सेकंड होम असल्याने तेथे त्यांचा सामना होण्यात आश्चर्य नाही पण इंग्लंड आणि श्रीलंकेत पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया हा सामना का झाला असेल?

2002 मध्ये कोलंबोत खेळला गेलेला कसोटी सामना हा कराचीत झालेल्या बसवरील बॉम्बहल्ल्यामुळे झाला होता. यातील पहिला सामना कोलंबोच्या पी.सुवर्णामत्तू स्टेडियमवर खेळला गेला तर नंतरचे दोन सामने शारजात खेळले गेले होते.

2010 मध्ये सुरक्षेच्या कारणास्तवच पाकिस्तान आयोजीत करणार असलेली ऑस्ट्रेलियाविरुध्दची मालिका इंग्लंडमध्ये खेळवली गेली होती.

दुसरी आणखी वैशिष्ट्याची बाब म्हणजे बांगलादेश व पाकिस्तानदरम्यान आतापर्यंत एकसुध्दा कसोटी सामना पाकिस्तानात खेळला गेलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER