सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या जनतेला 8 जुलैपर्यंत जिल्हा परिषदेत न येण्याच्या सूचना

Rohan Bane

रत्नागिरी(प्रतिनिधी):  रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचाही कोरोनाबाधितांमध्ये समावेश आहे. ही परिस्थिती पाहता सर्वसामान्य जनतेने 8 जुलैपर्यंत जिल्हा परिषदेत येऊ नये असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर सुरक्षिततेसाठी अध्यक्ष रोहन बने यांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत. संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांना होम क्वारंटाईन होण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच विविध विकासकामांसाठी जिल्ह्यातून शेकडो लोक जिल्हा परिषद इमारतीमध्ये येत असल्यामुळे सुरक्षिततेसाठी त्यांच्यावर बंधने घालण्यात आलेली आहेत. सध्या जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत कडक टाळेबंदी सुरु आहे.

त्यामुळे लोकांनीही जिल्हा परिषदेत येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. लोकांनी आपल्या कामांसाठी ऑनलाईन किंवा दूरध्वनीवरुन संपर्क साधावा. प्रशासनाच्या आदेशानुसार आरोग्य विभाग वगळता अन्य सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित 10 टक्केच ठेवण्यात आलेली आहे. जिल्हाभरातून येणारी टपाल सेवा मात्र सुरु असून त्यांच्यासाठी प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर आणि थर्मल तपासणीची व्यवस्था केलेली आहे, असे श्री. बने यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER