शिवसेनेला भोपळा? विधान परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पारड्यात ३ जागा

Mahavikas Aghadi

मुंबई :- विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) दणदणीत विजय मिळविला आहे. एकट्या भाजपा (BJP) विरोधात शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) अशी लढत झाल्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला आहे. परंतू शिवसेनेचा एकमेव उमेदवार पराभवाच्या छायेत आहे. सहापैकी चार पदवीधर-शिक्षक मतदारसंघांचे निकाल लागले असून काँग्रेस, राष्ट्रवादीला तीन जागांवर विजय मिळाला आहे. तर एका जागेवर निकालाची प्रतिक्षा आहे.

विरोधी पक्ष ठरलेल्या भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. धुळे-नंदुरबार मतदारसंघात भाजपाचे अमरीश पटेल जिंकले आहेत. तर औरंगाबाद पदवीधरमध्ये राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, पुणे पदवीधरमध्ये अरुण लाड (Arun Lad) विजयी झाले आहेत.

तसेच पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर असून अद्याप निकाल लागायचा आहे. दुपारपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. तर नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसच्या ॲड. अभिजित वंजारी यांनी दणदणीत विजय मिळविल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेचं खच्चीकरण झालं, तर राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली – चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER