अफगाणिस्तानच्या मुंबईतील वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

Zakia Wardak-Chhagan Bhujbal

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत झाकिया वर्दक (Zakia Wardak) यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची मंत्रालय येथे सदिच्छा भेट घेतली.

भुजबळ म्हणाले, अफगाणिस्तानशी असलेले सौहार्दाचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र शासन उत्सुक आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंदर्भातील माहिती अफगाणिस्तानला nधोरणे बनविताना निश्चितच उपयुक्त ठरतील. राज्यातील विविध विकासकामांबाबत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती यावेळी  भुजबळ यांनी दिली . अफगाणिस्तानची मुंबईतील पहिली महिला वाणिज्यदूत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगून झाकिया वर्दक यांनी आपल्या कार्यकाळात भारत आणि अफगाणिस्तानमधील उद्योग-व्यापार वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER