युजवेंद्र चहलची मंगेतर धनश्री वर्माच्या डान्सने सोशल मीडियावर लागली आग, पहा विडिओ

Yuzvendra Chahal - Dhanashree Verma

टीम इंडिया (Team India) आणि आयपीएलच्या (IPL) फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (RCB) खेळाडू युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) मंगेतर धनश्री वर्माचा (Dhanashree Verma) आणखी एक धमाकेदार डान्स विडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.

भारतीय क्रिकेट संघ आणि RCB चा फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियाची नवी सनसनी क्वीन बनली आहे. धनश्री सोशल मीडियावर डान्सचे काही नवीन विडिओ शेअर करत असते. प्रोफेशनल डान्सर म्हणून चहलच्या फ्यूचर वाईफचे हे डान्स विडिओ चाहत्यांनाही आवडतात. याच दरम्यान अलीकडेच धनश्री वर्माने आणखी एक लेटेस्ट विडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये धनश्री वर्मा आपल्या डान्स मूव्हजने इंटरनेटला आग लावत आहे.

धनश्रीच्या नृत्यात आहे सामर्थ्य
विशेष म्हणजे सध्या धनश्री वर्मा तिचा आगामी पती आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा जादूगार फिरकीपटू युजवेंद्र चहल समवेत इंडियन प्रीमियर लीग २०२० साठी UAE मध्ये आहे. अशा परिस्थितीत धनश्री वर्माचा हा ताज्या नृत्य विडिओ पहा, तुम्ही पाहू शकता या विडिओमध्ये ती आपल्या धमाकेदार डान्सने सोशल मीडियावर आग लावत आहे. धनश्री वर्माने हा विडिओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे.

ज्यामध्ये धनश्रीने या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड सुपरस्टार सैफ अली खानची फिल्म जवानी जानेमनच्या गल्ला गोरियान या गाण्यांवर नाचताना दिसली आहे. धनश्रीसमवेत असलेल्या या विडिओमध्ये तुम्ही तिचे डान्स क्रू मेंबर्ससुद्धा पाहू शकता.

विडिओला मिळाले आहेत अडीच लाखाहून अधिक लाईक्स
चहलची मंगेतर धनश्री वर्माच्या या उत्तम विडिओवर चाहते खूप लाईक आणि कमेंट करत आहेत. ज्याअंतर्गत धनश्रीच्या या विडिओवर जवळपास अडीच लाख लाईक्स आल्या आहेत. धनश्री वर्मा सोशल मीडियावर अशा प्रकारे चर्चेचा विषय होण्याची ही पहिली वेळ नाही.

याआधीही धनश्री वर्माचे अनेक डान्स विडिओ इंटरनेटवर वायरल झाले आहेत. यावर्षी लॉकडाउन दरम्यान युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने एकमेकांशी साक्षगंध केली होती आणि लवकरच दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER