युवराज सिंग क्रिकेटच्या मैदानात परतला, सय्यद मुस्तफा अली ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार

Yuvraj Singh

युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) नावाचा समावेश पंजाबच्या ३० संभाव्य खेळाडूंमध्ये करण्यात आला आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी -२० स्पर्धेत खेळताना दिसू शकतो.

माजी अष्टपैलू युवराज सिंगने बर्‍याच सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. वर्ल्ड कप २०११ चा ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ असलेला युवराज गेल्या वर्षी जूनमध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. आता युवराज पुन्हा क्रिकेटमध्ये परतण्याच्या मार्गावर आहे.

निवृत्तीनंतर पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सचिव पुनीत बाली यांनी त्याला आपल्या राज्यात खेळण्यास सांगितले होते आणि युवराजही पंजाबकडून खेळण्यास तयार होता. पुढील महिन्यात होणाऱ्या सय्यद मुस्तफा अली (Syed Mustafa Ali) करंडक स्पर्धेत युवराज सिंगचा पंजाबमधील ३० संभाव्य खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे.

BCCI १० जानेवारीपासून राष्ट्रीय टी -२० चॅम्पियनशिप सय्यद मुस्तफा अली करंडक आयोजित करण्याचे विचार करीत आहे. त्याची नियुक्त्यांची घोषणा नंतर केली जाईल. ही स्पर्धा जैव-सुरक्षित वातावरणात खेळली जाईल आणि २ जानेवारीपर्यंत संघ आपापल्या तळांवर एकत्र जमतील.

निवृत्तीनंतर युवराजने कनाडामधील ग्लोबल टी -२० लीगमध्ये भाग घेतला. युवराजने भारताकडून ३०४ एकदिवसीय सामने, ४० कसोटी आणि ५८ टी -२० सामने खेळले आहेत. सध्या ३९ वर्षीय युवराज मोहालीतील PCA स्टेडियममध्ये सराव करत आहे. आपल्या प्रॅक्टिसचा एक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावरही शेयर केला आहे.

पंजाबचे संभाव्य खेळाडू :
मनदीप सिंह, युवराज सिंह, अभिषेक शर्मा, सलील अरोड़ा, गीतांश खेरा, रमनदीप सिंह, सनवीर सिंह, करण कालिया, राहुल शर्मा, कृशन अलांग, संदीप शर्मा, अर्शदीप सिंह, इकजोत सिंह, नमन धीर, अभिषेक गुप्ता, हिमांशु सत्यवान, गुरकीरत सिंह, अनमोलप्रीत सिंह, प्रभसिमरन सिंह, निहाल वढेरा, अनमोल मल्होत्रा, आरूष सब्बरवाल, अभिनव शर्मा, हरप्रीत बरार, मयंक अरकांडे, बलतेज सिंह , सिद्धार्थ कौल, बरिंदर सरन, गुरनूर सिंह, हरजस, अभिजीत गर्ग, कुंवर पाठक.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER