युवराजसिंगचे टीकाकारांना उत्तर

राईचा पहाड केला

नवी दिल्ली :- पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीच्या फाउंडेशनला मदत करण्याच्या आवाहनावर होत असलेल्या चौफेर टीकेला माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराजसिंगने उत्तर दिले आहे. आपला कुणाच्याही भावना दुखवायचा हेतू नव्हता आणि मदत करण्याच्या आपल्या आवाहनाचा उगाचच राईचा पहाड केला जात असल्याचे म्हटले आहे.

गरजूंना मदत करण्याच्या आवाहनावर एवढे वादळ उठण्याचे कारणच काय ते मला समजत नाही. माझ्या आवाहनाचा हेतू एवढाच होता की, संबंधित देशांतील गरजू लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, मी अस्सल भारतीय आहे आणि माझे आपल्या देशावर प्रेम आहे; मात्र त्यासोबतच मी माणुसकीसाठी नेहमीच उभा राहणारा माणूस आहे, असे त्याने म्हटले आहे.


Web Title : Yuvraj Reacts to criticism

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)