इंदोरीकर महाराजांच्या कार्यक्रमाला युवासेनेचे संरक्षण, गडबड करणाऱ्यांना दिला इशारा

yuvasena-support-with-indurikar-maharaj-programme

कोहापूर : इंदोरीकर महाराजांचा आज कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापिठात नियोजित कार्यक्रम आहे. मात्र अंनिस आणि पुरोगामी संघटनांचा इंदुरीकरांच्या या कार्यक्रमाला विरोध केला आहे. स्त्री जातीचा अपमान करणाऱ्यांचा शिवाजी विद्यापीठात कार्यक्रम नको अशी आक्रमक भूमिका या संघटनांनी घेतली आहे. त्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा पुरोगामी संघटनांनी दिला आहे. यावर आता कोल्हापूरमध्ये युवसेना चांगलीच आक्रमक होत मैदानात उतरली आहे.

यावर आता कोल्हापूरमध्ये युवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. इंदोरीकारांच्या कार्यक्रमाला समर्थन देत जर कोणी इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला शिवसेना स्टाईल जशाच तस उत्तर देऊ अशी कठोर भूमिका युवासेनेने घेतली आहे. इंदोरीकर महाराज यांच्या शिवाजी विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमाला युवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित राहून सुरक्षा पुरवण असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कृती समितीच्या वतीने आयोजित ‘शिव महोत्सव’मध्ये आज, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन होणार आहे. मात्र, या कीर्तनाला अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि पुरोगामी संघटनांनी विरोध केला आहे. अंनिसच्या सीमा पाटील यांनी इंदोरीकर यांना कोल्हापूरात पाउल ठेवू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

आज इंदोरीकर महाराज कोल्हापुरात : शिवाजी विद्यापीठात तणाव