युवासेनेचा भाजप युवा मोर्चाला धक्का, असंख्य कार्यकर्त्यांचा युवासेनेत प्रवेश

Yuva Sena Hit To BJP Yuva Morcha

औरंगाबाद : राज्यात शिवसेनेचे (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) स्थापन झाले . तेव्हापासून शिवसेनेनेत मोठ्याप्रमाणात इनकमिंग होत आहे. युवासेना संभाजीनगर शहरांच्या पदाकरिता युवक युवतीच्या मुलाखतीचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी युवासेना (Yuva Sena) सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी यात मार्गदर्शन केले. यावेळी शेकडो भाजप (BJP) युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी युवासेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना वरून सरदेसाई म्हणाले, ‘यापुढे युवासेनेत मॅनेजमेंट नावाचा प्रकार नसेल. ज्याचे कार्य चांगले असेल त्यानुसार त्याला स्थान आणि पद देण्यात येईल.

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा सैनिकांमध्ये नवीन उत्साह निर्माण करण्यासाठी या कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना ही शिवसेनेसाठी कार्यकर्त्यांची फळी तयार करणारी एक युनिव्हर्सिटी आहे. त्यामुळे युवसेनेतील दीर्घ अनुभवानंतर शिवसेनेत जाण्याचा रस्ता मोकळा होतो. असेही देसाई यांनी नमूद केले.

यावेळी व्यासपीठावर युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, विस्तारक निखील वाळेकर, आविष्कार भूसे, योगेश निमसे, अभिमन्यू खोतकर, जिल्हा युवाधिकारी ऋषिकेश खैरे, मॅचिंद्र देवकर, कॉलेज कक्षप्रमुख ऋषिकेश जैस्वाल, युवती सेनेच्या डॉ. अश्विनी जैस्वाल, भा.वी. से. विद्यापीठ प्रमुख तुकाराम सराफ आदी उपस्थित होते. यावेळी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आदित्य दहिवाळ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत युवासेनेत जाहीर प्रवेश केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER