यूटय़ूब गर्ल ऊर्मिलाची गुडन्यूज हटके स्टाइलने

Urmila Nimbalkar

सिनेमापेक्षा आजकाल टीझर, ट्रेलर, प्रोमो याला जास्त महत्त्व आहे. टीझर, पोस्टर, ट्रेलर प्रोमोत उत्सुकता अगदी खचाखच भरलेली असते. यासाठी एक वेगळी क्रिएटिव्ह टीमच काम करत असते. आता हा सगळा फंडा सिनेमा हिट होण्यासाठी गरजेचा असतोच. लग्नाच्या फोटोपेक्षाही प्रीवेडिंग शूट हा प्रकारही ट्रेंडमध्ये आहे. पण आता हे उत्सुकतेचे वारे कलाकारांच्या व्यक्तीगत आयुष्यातही शिरले आहे.

कलाकारांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते अशाच टीझर किंवा प्री पोस्टचा ट्रेंड वापरून चाहत्याचे लक्ष वेधून घेत असतात. अभिनेत्री असली तरी सध्या यू ट्यूब गर्ल अशी ओळख असलेल्या ऊर्मिला निंबाळकर (Urmila Nimbalkar) हिने ती आई होणार असल्याची गोड बातमी देण्यासाठी अश्शीच ट्रीक वापरली. पहिल्या पोस्टमध्ये तिने प्रेक्षकांना आणि चाहत्यांना घाबरायला होईल असे शब्द लिहिले पण दुसऱ्या पोस्टमध्ये मात्र नवऱ्यासोबत खास फोटो शेअर करत कुणीतरी येणार गं हे सांगण्यासाठी ती पुन्हा सोशलमीडियावर आली. ऊर्मिलाच्या या दोन्ही पोस्ट व्हायरल झाल्या असून यूट्यूब व्हिडिओ हिट करण्यासाठी जसे उत्सुकता वाढवणारे थंबनेल दिले जाते तोच प्रकार ऊर्मिलाने तिची गुडन्यूज सांगण्यासाठी वापरल्याने ऊर्मिलाचा नेटकरीचाहता वर्ग जास्तच खुश आहे.

अभिनेत्री ऊर्मिला निंबाळकर सध्या पाच महिन्यांची प्रेग्नंट आहे. सुकिर्त गुमस्ते याच्यासोबत आठवर्षापूर्वी ऊर्मिलाने लग्न केलं. आता तिच्या घरी लवकरच पाळणा हलणार असून ऊर्मिला आणि सुकिर्त खूपच आनंदात आहेत. अभिनेत्रींच्या खऱ्या आयुष्यात काय सुरू आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच असते. आणि जर अशा घडामोडींकडे कान लावून बसलेल्या प्रेक्षकांना आयुष्यात नेमकं काय सुरू आहे हे खुद्द अभिनेत्रीनेच सोशलमीडियावरून सांगितले तर काय होईल ना. अचानक ऊर्मिलाच्या इन्स्टा पेजवर तिचा एक फोटो आणि त्यासोबत काही ओळी तिने लिहिल्या. यामध्ये तिने असं म्हटलं होते की आयुष्यात खूप काही सुरू आहे. पण सगळच जाहीरपणे सांगता येत नाही. काही गोष्टी चौकटीतच ठेवाव्या लागतात.. काही गोष्टी सुरक्षिततेच्या कारणामुळे जगाला सांगता येत नाही. पण स्वताच्या विश्वात सध्या बरच काही सादरीकरण सुरू आहे.

प्रत्येक गोष्टीचा फोटोही आपल्याला हवा तसा दाखवता येत नाही, तोपर्यंत समाजाच्या चौकटीम बसणारे फोटो पोस्ट करत रहायचे. ऊर्मिलाने लिहिलेली पोस्ट आणि त्यासोबतच तिचा फोटो हे पोस्ट केल्यानंतर खरंतर तिच्या चाहत्यांना तिची काळजी वाटायला लागली होती. आपल्या आवडत्या अभिनेत्रीच्या आयुष्यात असं काय सुरू आहे की ते तिला सांगता येत नाही. समाजाची चौकट आड येत आहे. तशी काळजी व्यक्त करणाऱ्या कमेंटनी ऊर्मिलाचा इनबॉक्सही भरून गेला. पण ऊर्मिलानेही फार न ताणवता दुसऱ्या दिवशी थेट सुकिर्तसोबत दुसरा फोटो शेअर केला ज्यामध्ये ती प्रेग्नंट असल्याचं दिसत होतं. हा फोटो एक एप्रिलला पोस्ट केल्यामुळे ही बातमी म्हणजे एप्रिलफूल नाही हे सांगण्यासाठी ऊर्मिलाने बेबी बंप दिसतील असा खुल्लमखुल्ला फोटो शेअर केला.

तिच्या या फोटोनंतर मात्र नेमकं तिच्या आयुष्यात काय घडलं आहे आणि ते सांगण्यासाठी तिला काही चौकटी पाळणं का गरजेचं होतं या प्रश्नाचं उत्तर तिच्या चाहत्यांना मिळालं आणि मग मात्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. थोडक्यात काय तर या यूटयूब गर्लने आई होणार असल्याची गुडन्यूज सांगण्यासाठी आधी एक प्रोमो वापरला आणि मग अख्खा सिनेमा रिलीज केला.

ऊर्मिलाने अनेक मराठी व हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. दिया और बाती हम या हिंदी मालिकेसह दुहेरी या मराठी मालिकेतील तिची भूमिका गाजली होती. संगीत सम्राट या शोचे निवेदनही तिने केले होते. सध्या मात्र ऊर्मिला व्हिडिओ ब्लॉगर म्हणून प्रसिद्ध असून फॅशन, स्टाइल याविषयी तिचे व्हिडिओ यूटयूबवर तुफान गाजत असतात. दर शुक्रवारी ऊर्मिला फॅशनच्या कोणत्या नव्या टिप्स घेऊन आली आहे हे पाहण्यासाठी तिच्या व्हॉगकडे नेटकरी लक्ष लावून असतात. पण गेल्या काही दिवसात मात्र ऊर्मिला प्रत्येकाचीच काळजी, उत्सुकता आणि हुरहूर वाढवत तिच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार असल्याची बातमी हटके पद्धतीने देत चर्चेत आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button