
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण (MNS) सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) राजकारणात चांगलेच सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमित ठाकरे यांच्या राजकारणातील सक्रिय प्रवेशाला नुकतीच वर्षपूर्ती झाली. त्यानिमित्त अमित ठाकरे यांच्या कामाचा रिपोर्टही मनसेकडून देण्यात आला आहे.
युवावर्गात अमित ठाकरे यांची क्रेझ वाढत चालल्याचे आता पाहायला मिळत आहे. अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते आज रुग्णवाहिकेचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी अमित ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच झुंबड उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छाही दिल्या.
दरम्यान अमित ठाकरे यांचे वर्षभराचे रिपोर्ट कार्ड मनसेने जारी केले आहे. अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी नियुक्ती होऊन वर्षपूर्ती होत आहे. त्याबाबत मनसेने व्हिडीओ ट्रेलरच्या माध्यमातून अमित ठाकरेंचे रिपोर्ट कार्ड सादर केले आहे.
ही बातमी पण वाचा : अमित ठाकरेंनी वर्षभरात काय केले ? मनसेकडून व्हिडीओ ट्रेलरच्या रिपोर्ट कार्ड जारी
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला