धक्कादायक; पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार

पनवेल : एकीकडे कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सर्वच जण प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी संशयित रुग्णांना क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात येत आहे. मात्र पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केलेल्या एका महिलेवर क्वारंटाईन असलेल्याच एका युवकाने बलात्कार केल्याची धक्कादायक बातमी पुढे आली आहे.

संपूर्ण जग सध्या कोरोनावर मात करण्यासाठी लढा देत आहे. कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. यानुसारच पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोना संशंयीतांना किंवा हाय रिस्क लोकांना क्वारंटाईनची व्यवस्था कोण येथील इंडिया बुल्स येथे करण्यात आली आहे. या इमारतीतच हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बलात्काराची ही घटना गुरूवारी मध्यरात्री घडली असून क्वारंटाईन सेंटमध्येच कोरोना संशयीत म्हणून दाखल झालेल्या एका महिलेवर एका विकृत तरुणाने बलात्कार केल्याची माहिती पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे.

पोलिसांनाी याबाबत तत्काळ कारवाई करत कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पनवेल पोलिस पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER