कोल्हापुरात तरुणाचा भोकासून खून

Youth murder in Kolhapur

कोल्हापूर :  कागल येथील आंबेकर एक्साईज परिसरात राहणाऱ्या तरुणावर अनोळखी तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला केेला.

सुरज नंदकुमार घाडगे वय 24 असे तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात तरुण ठार झाला. शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमाराला कोल्हापुरातील कागल येथे ही घटना घडली. दुचाकीवरून तीन तरुण सुरजच्या घरी आले. त्यांनी सूरजला काही विषयावर बोलायचे आहे. असे सांगून बाहेर नेले. घरापासून 50 ते 60 फूट अंतरावर असताना तिथे हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने सपासप वार केले . आई सुरेखा आणि गल्लीतील तरुणाने जखमी अवस्थेतील सूरजला दवाखान्यात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत कागल पोलिसात गुन्हा नोंद झाला.

हि बातमी पण वाचा : कोल्हापुरात 24 तासात दुसरा खून