तीन दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनात, ट्रॅक्टर उलटल्याने ऑस्ट्रेलियातून आलेल्या युवकाचा मृत्यू

Tractor Overturned - New Delhi

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) दिवशी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला (Tractor Rally) हिंसक वळण लागलं. हिंसाचाराच्या घटनेत 300 पोलीस जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिली आहे. तर, ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे मृत्यू झालेल्या युवकाची ओळख पटली आहे. नवरीट नावाचा युवक ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वीच तो भारतात आला होता. तो तीन दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनाशी (Farmers Protest) जोडला गेला होता.

टीव्ही-9ने दिलेल्या वृत्तानुसार नवरीट काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातून भारतात परत आला होता. 27 वर्षीय नवरीट शेतकरी आंदोलनाशी जोडला गेला होता. मात्र, त्याच्या कुटुंबाला याबाबत कसलीच माहिती नव्हती. नवरीट हा उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यतील दिबदिबा गावातील असल्यची माहिती समोर येत आहे. रामपूर जिल्ह्यातील विलासपूर भागातील शेतकरी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले होते. मंगळवारी दिल्लीच्या आयटीओजवळ ट्रॅक्टर पलटी झाल्यानं नवरीटचा मृत्यू झाला होता.

नवरीट ज्या ट्रॅक्टरवर बसला होता तोउलटल्याने त्याचा मृत्यू झाला. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांकडून धोकादायक पद्धतीनं ट्रॅक्टर चालवले जात होते. पोलिसांनी जखमी नवरीटला वाचवण्याचा प्रयत्न केला होता .मात्र ,आंदोलकांनी मदत करु दिली नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे. आंदोलक त्या युवकाच्या मृतदेहाजवळ बसले होते. ते पोलिसांना जवळपास जाऊ देत नव्हते. पोलिसांचा नवरीटच्या मृतदेहाचं पोस्ट मॉर्टम करण्याच प्रयत्न होता, अशी माहिती पोलिसांकडू देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER