युवकांनो-“त्या ” अंधार वाटेने जावू नका !

हत्या, आत्महत्यांवरून (Murder, suicides) विधानसभेमध्ये परस्पर विरोधी मतांमध्ये संघर्ष होत असतानाच ,एकीकडे इकडे धर्मापुरी सारख्या परभणी जिल्ह्यातल्या शुभम उगले या कॉलेजवयीन मुलाने आत्महत्या केली. बीए प्रथम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने सततचे लॉक डाऊन आणि कोरोना यामुळे माझ्या शिक्षणाचे पुढे काय होणार? याच्या ताणात आत्महत्या केली .तो सतत एकटा राहात होता. लॉक डाऊन मुळे ताण आणखीनच वाढला. तीच स्थिती बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील तेरा वर्षाच्या मुलीने घरातील कामे सांगतात, म्हणून रागाच्या भरात आत्महत्या केली. मराठवाड्यात एवढ्यातच तीन शेतकरी आणि तीन कॉलेजवयीन मुले असे आत्महत्यांचे सत्र आणि एकीकडे प्रचंड वेगात वाढणारा कोरोना आणि त्यामुळे मानसिकतेवर होणारा परिणाम.

यामध्ये सगळ्यात जास्त भरडला जातोय तो विद्यार्थी वर्ग! भविष्याची अगणित स्वप्न घेऊन तो या उद्याच्या जगाला सामोरे जाण्यासाठी उभा आहे त्यांच्यासाठी हा असा लॉक डाउन . म्हंने अंशतः ! निराशाजनक ठरतो आहे. सगळ्यात पहिल्यांदा बंद होतात ते काय तर शाळा आणि कॉलेजेस ! तिथे म्हणे जास्त संख्येने लोक एकत्र येतात. हे बरोबरही आहे, पण ते सगळे सुशिक्षित आणि सुज्ञ असतात. ते परस्परांना काळजी घेण्याची आठवण करुन देऊ शकतात. पण दोन तीन दिवसापूर्वी गावावरून येताना बाजारांच्या ठिकाणी अफाट माणसे गर्दी करू न मास्क शिवाय वावरत होती. कसा नाही पसरणार कोरोना ? आपली यंत्रणा येथे पोहोचत नाही की कानाडोळा करते ! आपल्याकडचे लोक असा अंशतः लॉकडाऊन लावून ऐकणारे नाहीतच. हे सगळे लोक कोरोनाला इतके सहजतेने घेतात आहेत. मास्क, डिस्टंसिंग पाळणे, सनी टायझर चा वापर या कशाचीही आठवण ठेवली जात नाही .आणि लॉक डाऊन बाबत सतत वेगवेगळ्या बातम्या कानावर येत आहे. दररोजची वाढणारी रुग्णांची संख्या ही ही मनाची चलबिचल वाढवणारी आहे आधी अंदाज वर्तविला प्रमाणे ही दुसरी लाट जास्तच तीव्र आहे.

अंशतः लॉक डाउनचा ही सगळीकडे गोंधळ सुरू आहे. अक्षरश: बिना सेल असलेले थर्मल गन,तपासणी झाल्यावर तीच गन दुसऱ्यांना पास करत जाणे ,काही लोक मास्क गाडीत ठेऊन फिरत असतात, तर काहींचे केवळ गळ्यात अडकवलेले असतात. भाजीबाजाराला केलेले सात दिवस बंद चे आवाहनाचे तीन तेरा वाजले. पहाटे साडेतीन तीन ते पाच दरम्यान आजूबाजूच्या खेड्यातील अनेक शेतकरी माल घेऊन येतात .पहाटे साडेपाच ला पोलीस सायरन वाजवत दाखल होतात आणि मग साडेसहा वाजता लोक ऐकत नाहीत हे बघून त्यांना हुसकवण्याचा प्रयत्न होतो.

औषध हा लॉकडाऊन चा फटका पर्यटन क्षेत्राला सुद्धा बसला आहे. पर्यटन स्थळे बंद राहणार असल्याचे कळल्याने इकडे टूर प्लॅन केले जात नाही .आणि याबाबत स्पष्ट कल्पना किंवा माहिती पुरातत्त्व विभाग अधिकाऱ्याला सुद्धा नाही. थोडक्यात अंशतः लॉक डाऊन म्हणजे केवळ गम्मत जम्मतचा खेळ बनतो आहे.

आता पूर्ण लॉक डाऊन लावून लोकांना पूर्ण बंद करणे अयोग्यच आहे .आणि अंशतः लॉक डाऊन चा उपयोग परिणाम दृष्ट्या जवळ जवळ शून्यच आहे .त्यामुळे लॉक डाऊन चा बागुल बुवा उभा करून चालणार नाही.

सद्य स्थितीत युवकांना त्यांच्या भवितव्यावर होणाऱ्या परिणामांची प्रचंड चिंता आहे .आयुष्यातील ही खूप महत्त्वाची वर्ष त्यांची आहेत .त्यामुळे कोरोना एकूणच समाजाच्या मानसिकतेवर परिणाम करतो आहे. कोरोना आणि वाढती महागाई त्याच्याबरोबर कमी कमी होत जाणारे उत्पन्न यात माणसाला क्षणाक्षणाने कमी होत जाणारे आयुष्य दिसते आणि पै पैं ची काळजीही वाटते.

युवकांनो ! आता लस आलेली आहे. “हे ही दिवस जातील !”कोणतीही एक स्थिती नेहमी करता तशीच राहू शकत नाही. उलट अशा कठीण परिस्थितीतून माणूस तावून-सुलाखून निघतो आणि जास्तच तेजस्वी बनतो. त्यामुळे चिंता करण्यापेक्षा आपल्यासाठी आता अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं खूप आवश्यक आहे. पेपर्स लिहिण्याची प्रॅक्टिस गेलेली आहे .त्यामुळे तो सराव सतत सुरू ठेवायला हवा आहे. मार्कांसाठी अभ्यास ही पण संकल्पना थोडी बाजूला ठेवून आज मी प्रत्यक्ष काम करायला लागल्यावर मला कोणते ज्ञान प्रत्यक्ष वापरावे लागेल याचा ही थोडा विचार करा. तरुणांनी आशावादी राहिलं ,तरच घर आशावादी राहील. आणि नेहमी डोळ्यासमोर एक चांगलं सकारात्मक चित्र ठेवा. लॉ ऑफ अट्रॅक्शन नुसार तेच तुमच्याकडे येणार आहे. सामाजिक सुज्ञ माणसाची ही जबाबदारी आहे की समाज मनावरील होणारा नैराश्य चिंता याचा काळोख नष्ट करायचा. त्यासाठी फार दूर काही करण्याची गरज नाही तर आपल्या व आपल्या कुटुंबियांसह इतर पाच जणांची काळजी वहायची. मुले ,विद्यार्थी ,कुटुंब ,आप्तेष्ट ,मित्रमंडळी ,पालक ,शिक्षक या सगळ्या पातळ्यांवर परस्पर संवाद वाढायला पाहिजे. सोशल डिस्टंसिंग हे शारीरिक दृष्ट्या सांगितलेले आहे, परंतु त्याचा उत्तरार्ध हा आहे की भावनात्मक दृष्ट्या जवळ येणं, एकत्र येणे समजून घेणे आणि एकमेकांना सपोर्ट देणे याची गरज वाढली आहे. कोणताही विद्यार्थी परीक्षा जवळ आली की खूप जोमाने अभ्यास करतो .त्यामुळे परीक्षा जर नेमकी केव्हा आहे हे कळले नाही तर एक अभ्यासाचा टेम्पो असतो तो निघून जातो. परंतु फ्रेंडस् ! एक नक्की की परीक्षा हा एक भाग असला, तरी ज्ञान मिळवून त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करता येईल यादृष्टीने स्वतःला तयार करता येणे आणि स्वयंरोजगाराच्या मार्गाने जाऊन विविध कार्य कौशल्य शिकणे, कुठलाही काम मोठं किंवा छोटं नाही, त्यामुळे चार जणांना मी रोजगार कसा देऊ शकेल याचा विचार करा.

कोरोना आणि लॉक डाऊन ही नैसर्गिक आपत्ती आहे. ती फार माझ्या हातात नाही. म्हणजे तसा हा माझ्या हाताबाहेरचा प्रश्न आहे. आणि त्याच प्रमाणे हा प्रश्न केवळ माझा नाही तर माझ्यासारख्या अनेकांचा आहे. असा विचार केला तर हा “सावळागोंधळ” सहन करणे तुम्हाला सोपे जाईल .त्यासाठी सगळ्या संपर्क माध्यमांचा उपयोग करा. शक्य असेल तेव्हा इतर लोकांशी अनुभव शेअर करा ,तयारी करत रहा, यश तुमचंच आहे ! पण…. पण “त्या “अंधार वाटेने जाण्याचा चुकूनही विचार करू नका ! कुणाशी तरी बोला .मन मोकळं करा.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER