‘तुमची कामगिरी एकदम बेकार !’ अजित पवार जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले

ajit pawar - Milind Dhambharkar - Maharashtra Today

मुंबई :- सोलापूरच्या पाणीप्रश्नावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांना खडेबोल सुनावले आहे. उजनी ते सोलापूर (Solapur) समांतर जलवाहिनीच्या प्रलंबित कामांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी मंगळवारी मुंबईतून व्हीसीद्वारे बैठक घेतली. तुमची कामगिरी एकदम बेकार सुरू आहे. भूसंपादनाची नुकसानभरपाई ५५ कोटींवरून १३० कोटींवर गेलीच कशी, याची चौकशी करा. मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, आयुक्त, महापौर यांची एक समिती करून अहवाल पाठवा.

आम्ही निधी उपलब्ध करून देऊ, असेही अजित पवार म्हणाले. समांतर जलवाहिनीच्या भूसंपादनाची नुकसानभरपाई ५५ कोटी निश्चित केली होती. मात्र माढ्यातील राजकीय नेत्यांनी कृषी अधिकाऱ्यांमार्फत मूल्यांकन वाढवून घेतले. आता ही रक्कम १३० कोटी रुपयांवर गेली आहे. मूल्यांकन कसे वाढले याची चौकशी करावी, असे आदेश अजितदादांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लवकरच अहवाल सादर करण्याचे आदेशही दिल्याचे सांगण्यात आले.

ही बातमी पण वाचा : एका मुलाची कैफियत ऐकल्यानंतर अजित पवार झाले भावुक ; मदतीसाठी गेले धावून

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button