‘तुझा हप्ता, तुझा घरखर्च, सामान्य माणसा तूच तुझा वाली’, भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्ण आणि मृत्युसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या महिनाभरापासून राज्यात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील कडक निर्बंध ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयावर विरोधी पक्ष भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना टोला लगावला आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटले की, लॉकडाऊन (Lockdown) पुन्हा वाढला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेच होते, “माझे कुटुंब, माझी जबाबदारी! सामान्य माणसा, नोकरदारा, बलुतेदारा, कष्टकरी मजुरा, तूच आहेस तुझा रक्षणकर्ता. मायबाप राज्य सरकारने तुला नव्या लाटेत वाऱ्यावर सोडले आहे. तुझा हप्ता, तुझा घरखर्च, तुझं लाईट बिल तूच पाहा.” असा चिमटा त्यांनी महाविकास आघाडी सरकारला काढला आहे.

तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारमालकांची काळजी घेतली आहेच. तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घे. वसुली सरकारवर विसंबून राहण्यात अर्थ नाही. वसुली सरकारमध्ये पोलिसात वाझे तर लस द्यायला फरहान अख्तर लाडका आहे. सामान्य माणसा तूच तुझा वाली आहे, असंही केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button