… तुमचा बाप आणि भाऊ, …; रामदेव बाबांच्या वक्त्यावरुन तृणमूलच्या खासदारांचा मोदी-शहांना टोमणा

Maharashtra Today

कोलकाता : अ‍ॅलोपॅथी (Allopathy)उपचारपद्धती व अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे योगगुरू बाबा रामदेव(Baba Ramdev) वादात अडकले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनचा बाबा रामदेव यांना अटक करण्याचा हॅशटॅगही सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये होता. त्यावर बाबा रामदेव म्हणालेत – कुणाचा बापही मला अटक करू शकत नाही! यावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी बाबा रामदेव यांना सुनावताना नाव न घेता मोदी-शहांवर टीका केली.

महुआ मोईत्रा यांनी ट्विट केले – “स्वामी रामदेवला कुणाचा बापही अटक करू शकत नाही.” रामकृष्ण यादव, आपण खरं बोललात. तुमचा भाऊ आणि बाप तर विरोधकांना अटक करण्यात गुंतले आहेत.”

बाबा रामदेव यांनी ऍलोपॅथी आणि डॉक्टरांबाबत केलेल्या विधानांचा निषेध करत आयएमएने बाबा रामदेव यांच्याविरुद्ध साथरोग कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. बाबा रामदेव यांच्याविरोधात आयएमएने आक्रमक पवित्रा घेतला आहे व त्यांनी १५ दिवसात माफी मागावी अन्यथा १००० कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी नोटीस बजावली आहे.

पंतप्रधानांना पत्र

बाबा रामदेव यांनी लसीकरणाबाबत चालवलेली चुकीच्या माहितीची मोहीम थांबवा. रामदेव यांची अशा पद्धतीची वक्तव्ये देशद्रोही स्वरूपाची असून, त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाच्या आरोपाखाली दिरंगाई न करता गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारे पत्र आयएमएने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. ‘करोना लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतरही डॉक्टर मंडळी मृत्यूमुखी पडली आहेत’, या रामदेव यांच्या दाव्यामुळे लोकांच्या मनात संशय उत्पन्न होईल. याला आळा घालण्याची गरज असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button