तुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला

CM Uddhav Thackeray-Ashish Shelar

मुंबई : भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विटरवरून पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केले आहे. ‘आम्ही पर्यावरण पुरक दिवे लावले ते पाप?, झाला ना तुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड?, आता क्विन नेकलेसची माळ हे तोडूच टाकत आहेत, क्विन नेकलेसच राहणार नाही त्याचे काय? असं म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल केला आहे.

आशिष शेलार यांनी आज ट्विटरवरून ट्विट केलं आहे. केंद्र सरकारच्या पुढाकाराने पर्यावरण पुरक एलईडी दिवे (LED Light) मुंबईत लावले गेले तेव्हा काही जणांनी मरिन ड्राईव्ह, क्विन नेकलेसची शोभा जाईल म्हणून केवढा थयथयाट केला. अखेर झाले काय? तर शोभा वाढलीच! पण.. आता क्विन नेकलेसची माळ हे तोडूच टाकत आहेत, क्विन नेकलेसच राहणार नाही त्याचे काय? असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

आता पारसी गेट तोडलाच…समुद्रात अधिकचा भराव टाकून ती जागा पण खाणार…परिसराची शोभा घालवणार. आता हे तुम्ही करताय ते पुण्य?, आम्ही पर्यावरण पुरक दिवे लावले ते पाप?, झाला ना तुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड?, मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या “ढोंगीपणाचा गाळ” दिसला ना!, असं ट्विट शेलार यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER