थिएम विरुध्द झ्वेरेव्ह ही 2014 नंतरची सर्वात तरुण खेळाडूंची अंतिम लढत

Youngest final match of US open.jpg

ऑस्ट्रियाचा (Austria) डॉमिनिक थिएम (Dominic Thiem) व जर्मनीचा (Germany) अलेक्झांडर झ्वेरेव (Alexander Zverev) यांनी यंदाच्या युएस ओपन टेनिस (US Open Tennis) स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. या दोघांच्याही नावावर अद्याप ग्रँड स्लॅम विजेतेपद नाही . थिएम हा 27 आणि झ्वेरेव्ह 23 वर्षांचा आहे. त्यामुळे पुरुषमधे ही 2012 नंतरची सर्वात कमी वयाच्या खेळाडूंची अंतिम लढत असेल . 2012 मध्ये नोव्हाक जोकोवीच आणि राफेल नदालदरम्यान अंतिम सामना झाला होता तेंव्हा त्यांचे वय अनुक्रमे २४ व 25 वर्षे होते.

2011 च्या विम्बल्डन म ध्येही हे दोघे अंतिम फेरीत यापेक्षाही कमी वयाचे असताना खेळले होते.2011 चाच ऑस्ट्रेलियन ओपनचा जोकोवीच व मरेदरम्यानचा अंतिम सामना असाच कमी वयाचा होता.

उपांत्य सामन्यात थिएमने दानिल मेदवेदेववर 6-2, 7-6(9-7), 7-6(7-5) असा विजय मिळवला . आधी 3 वेळा अंतिम फेरीत हरल्यावर तो प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला आहे. याआधी तो दोनवेळा । फ्रेंच ओपन व एकदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पराभूत झाला आहे. याबद्दल तो म्हणतो की मी झ्वेरेवशी खेळण्यास उत्सुक आहे . जिकलो तर माझे हे पहिले यश असेल आणि हरलो तर मी अँडी मरेला विचारेल की 0-4 झाल्यावर कसे वाटते .

दुसरी कडे अलेक्झांडर झ्वेरेव्हने स्पेनच्या पाब्लो करेनो बस्टा याला 3-6, 2-6 असे पहिले दोन सेट गमावल्यावर पुढचे तीन सेट 6-3, 6-4, 6-3 असा विजय मिळवला .

थिएम विरुद्ध मेदवेदेव ने संधी गमावल्या. दुसऱ्या व तिसऱ्या सेटमधे थिएम मागे पडला होता. तिसऱ्या सेटच्या टायब्रेकर मध्ये थिएम कडे 5-1 अशी भक्कम आघाडी होती. पण त्याला सहज टायब्रेकर जिंकता आला नाही.

झ्वेरेव पहिल्यांदा ग्रॅड स्लॅम च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.त्याने पहिल्या दोन सेटमध्ये पाच वेळा सर्विस गमावली. त्यामुळे या आधी कधीच दोन सेटच्या पिछाडीवरून न जिंकलेल्या या जर्मन खेळाडूची वाटचाल संपल्याचे मानले जात होते पण त्याने कमाल
केली.

दोन सर्विस ब्रेक घेत त्याने तिसरा सेट घेतला आणि पुढे सामना 2-2 असा बरोबरीवर आणला. त्यावेळी मेदवेदेवला थकवा जाणवायला लागला त्याला ट्रेनरची मदत घ्यावी लागली. आदला सामनासुद्धा पाच सेट खेळलयचा परिणाम दिसू लागला. त्यानंतर शेवटचा सेटमध्ये लवकर ब्रेक मिळवून झ्वेरेव्हने 3 तास 22 मिनिटात सामना संपवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER