राहत्याघरी गळफास घेवून तरूणाची आत्महत्या

committed Suicide

औरंंंगाबाद : सिडको एन-९ परिसरातील रायगडनगर येथे राहणाऱ्या राजेश रमेश औटे (वय ३०) या तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केली. राजेश औटे यांनी ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजे दरम्यान राहत्या घरी छताच्या पंख्याला साडीने बांधुन गळफास घेतला होता. औटे याला बेशुध्दावस्थेत घाटीत दाखल केली असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.