कितीतरी वर्षात ग्रँड स्लॅम टेनिसमध्ये चमकतेय ‘यंग ब्रिगेड’

Felix Auger Aliassime - Alex de Minaur - Casper Ruud

पुरुषांच्या टेनिसमध्ये यंदाच्या युएस ओपनमध्ये (US open Tennis) एक अगदी वेगळेच चित्र बघायला मिळत आहे. 22 वर्षांच्या आतील 11 खेळाडू स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत पोहोचले तर त्यातील सहा खेळाडूंनी चौथी फेरीसुध्दा गाठली आहे. हे यासाठी वैशिष्ट्यपूर्ण की 2005 नंतर ग्रँड स्लॅम (Grand Slam) टेनिस स्पर्धेत पहिल्यांदाच एवढ्या संख्येने यंग ब्रिगेड (Young Brigade) अंतिम 32 मध्ये पोहोचलेली दिसली. नाहीतर आंतरराष्ट्रीय टेनिसवर सहसा फेडरर (Federer) – नदाल (Nadal) – जोकोवीच (Djokovic) – मरे (Murray) या बिग फोरशिवाय स्टोन वावरिंका वगैरेसारख्या खेळासाठी वयाने काहीशा प्रौढ अशा खेळाडूंचेच वर्चस्व राहिले आहे.

2005 च्या विम्बल्डन स्पर्धेत बाविशीच्या आतील 13 खेळाडू तिसऱ्या फेरीत पोहोचले होते तर युएस ओपनमध्ये 1992 नंतर प्रथमच एवढ्या संख्येने यंग गन्स चमकत आहे. नदाल- फेडरर- वावरिंका अशा अनुभवी खेळाडुंच्या यंदाच्या यूएस ओपनमध्ये सहभाग नसल्याचा परिणाम निश्चितच पण टेनिसच्या भविष्याच्या दृष्टीने हे चित्र चांगलेच आहे.

अंतिम 32 मध्ये पोहोचलेल्या युवा खेळाडूंमध्ये फेलिक्स ओगार अलैसीम (वय 20), अॅलेक्स दे मनोर (वय 21), कॅस्पर रुड (21), कोरेंटीन मुटेट (21), जे. जे. वुल्फ (21), आंद्रे रुबलेव्ह (22), फ्रान्सिस टिफो (22), डेनिस शापोव्हालोव्ह (21), अलेक्झांड्रो डेव्हिडोवीच फोकिना (21), स्टेफानोस सिसीपास (22) व टेलर फ्रित्झ (22) यांचा समावेश आहे. यापैकी फेलिक्स ओगार, रुबलेव्ह, दे मनोर, टिफो, फोकीना, शापोव्हालोव्ह या सहा जणांनी अंतिम 16 मध्येही स्थान मिळवले आहे.

यापूर्वी 2008 मध्ये युएस ओपनच्या तिसऱ्या फेरीत सात खेळाडू 21 वर्षे वयाच्या आतील होते. त्यात केई निशीकोरी, युआन मार्टिन डेल पोत्रो, मारिन सिलीच, सोम क्वेरी, नोव्हाक जोकोवीच, अँडी मरे व गेल मोनफिल्स यांचा समावेश होता. त्यानंतर आता प्रथमच एवढे युवा खेळाडू पुरुष एकेरीत चमकत आहेत.

पुरुषांच्या अगदी उलट चित्र महिला एकेरीत आहे. पुरुषांच्या टेनिसमध्ये मोजक्यांच खेळाडूंचे वर्चस्व आहे तर महिलांमध्ये सेरेनाच्या घसरणीनंतर असा कुणाचाच दबदबा राहिलेला नाही. 2017 मध्ये सेरेनाने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर पुढच्या 12 पैकी आठ ग्रँड slam स्पर्धात नाओमी ओसाका व बियांका आंद्रिस्कूसारखे नवे चेहरे विजेते म्हणून समोर आले आहेत. 2010 पासूनचा विचार केला तर 19 ग्रँड slam विजेत्या महिलांपैकी,16 जणी पहिल्यांदाच ग्रँड slam स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यापैकी नऊ जणींना तर त्या एका यशाची पुनरावृत्ती करता आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER