कॉलेजमध्ये मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स

College - Driving License

मुंबई : वाहन चालवण्याचा परवाना (लायसन्स) काढण्याबाबत तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी परिवहन विभागाने महाविद्यालयांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्थानिक प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयांनाही (आरटीओ) (RTO) पुढाकार घ्यावा लागणार आहे.

स्थानिक आरटीओशी संबंधित विभागातील विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना किंवा महाविद्यालयाच्या प्रतिनिधींना संपर्क साधावा लागणार आहे. त्यानंतर अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांना शिकाऊ परवाना (लर्निंग लायसन्स) मिळवता येईल, अशी माहिती परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे (Avinash Dhakne) यांनी दिली.

वाहन चालकांना परवाना काढण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. अधिकाधिक तरुणांना लायसन्स काढण्याची प्रक्रिया समजावी म्हणून आता महाविद्यालयात जाऊन विद्यार्थी व विद्यार्थिनींना आरटीओतील अधिकारी व कर्मचारी लायसन्स काढण्याचे प्रशिक्षण देतील. परिवहन विभागाचे कर्मचारी व अधिकारी विद्यार्थ्यांना लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करण्यात मदत करतील. तसेच प्रशिक्षणही देतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER