सत्तेसाठी तुम्ही सर्वच गुंडाळल; राधाकृष्ण विखे पाटलांची शिवसेनेवर टीका

Radhakrishna Vikhe Patil - CM Uddhav Thackeray

अहमदनगर : ‘तुमचा मुद्दा मंदिरापुरता किंवा हिंदुत्वापूरता मर्यादित नव्हता मग कशापुरता आहे?’, असा खोचक प्रश्न भाजपाचे (BJP) नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शिवसेनेला विचारला आहे. ‘सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही सर्वच गुंडाळल. महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी पाहते आहे. जनता याचा जाब तुम्हाला नक्की विचारणार, असा इशारा त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दिला.

एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले – शिवसेनेकडे आज कोणता मुद्दा शिल्लक आहे. सत्ता टिकवण्यासाठी त्यांनी सर्व मुद्दे सोडून दिले आहेत. हिंदुत्वदेखील सोडले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी बाबरी मस्जिद माझ्या शिवसैनिकांनी पाडली, असे समर्थन केले होते. मात्र, आज त्यांच्याच शिवसेनेने सर्वच भूमिकांमध्ये बदल केला आहे.

दरम्यान, शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपाकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना म्हटले होते, आम्हाला कुणीही हिंदुत्व शिकवू नये. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. तुमच्यासारख सोयीच हिंदुत्व आम्ही मिरवत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER