‘तेरे को का लगता था की नहीं लौटेंगे… गलत’; फडणवीसांना उद्देशून जयंत पाटलांचा दमदार व्हिडीओ

Devendra Fadnavis-Jayant Patil

मुंबई: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे आता कोरोनामुक्त झाले आहेत. जवळपास 15 दिवसाच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली असून आजपासून कामकाजाला सुरुवातही केली आहे. पाटील यांच्या समर्थकांनी मात्र, त्यांच्या दमदार एन्ट्रीचा एक 27 सेकंदाचा व्हिडीओ तयार करून फेसबुकवर टाकला असून हा व्हिडीओ चांगलाच शेअर होत आहे.

जयंत पाटील यांनी काल ट्विट करून ते कोरोनातून मुक्त झाल्याचं स्पष्ट केलं आहे. १४ दिवसांचा क्वॉरंटाईन काळ पूर्ण करत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार आहे. या काळात मुंबई महापालिका आणि इतर शासकीय यंत्रणेने वेळोवेळी केलेल्या सहकार्याबाबत मी आभारी आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये, चाचण्या करून घ्याव्यात. योग्य औषधोपचार घेऊन आपण कोरोनावर मात करू शकतो, असं पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, जयंत पाटील कोरोनामुक्त झाल्यानंतर यांच्या चाहत्याने एक 27 सेकंदाचा व्हिडीओ तयार केला आहे. त्याला टायगर अभी जिंदा है असं नाव देण्यात आलं आहे. या व्हिडिओत जयंत पाटील समर्थकांसह चालताना दिसत आहेत. तसेच विधानसभेत आणि सभागृहात बोलताना दिसत आहेत. तर मध्येमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचेही फोटो दाखवण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.

पाटील यांच्या या दमदार एन्ट्रीच्या व्हिडीओमध्ये ‘मांझी- द माउंटेन मॅन’ या सिनेमातील नवाजुद्दीन सिद्दिकी यांचा एक डायलॉगही आहे. पाटील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असताना बॅकग्राऊंडला, ‘ले फिर आ गए… सब राजी खुशी हां… तेरे को का लगता था की नहीं लौटेंगे… गलत… जब तक तोड़ेंगे नहीं, तब तक छोड़ेंगे नहीं, बहुतै बड़ा दंगल चलेगा रे तोहर हमार…’ हा संवाद दाखवण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये हा डायलॉग सुरू असताना पाटील यांच्यासोबतच फडणवीस यांचेही फोटो दाखवण्यात आला आहे. हे सर्व डायलॉग फडणवीस यांनाच उद्देशून म्हटल्याचं दिसत आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER