‘लढाई तुम्ही सुरू केली, आत ही लढाई आम्हीच संपवणार’; मनसेचे निलेश लंकेंना थेट आव्हान

Nilesh Lanke - MNS - Maharashtra Today

मुंबई : बनावट ऑडिओ क्लिप तयार करुन सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर मनसेच्या पदाधिकाऱ्यालाअब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे. अविनाश पवार असं या मनसे पदाधिकाऱ्याचं नाव आहे. आमदार लंके यांनी वकिलामार्फत पाठवलेल्या या नोटीसमध्ये अविनाश पवार यांच्याकडे बदनामी पोटी १ कोटी रुपये आणि नोटीस खर्च ५ हजार असे एकूण १ कोटी ५ हजार रुपये देऊन माफी मागण्याची मागणी केली आहे.

निलेश लंके यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्याला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट करत निलेश लंके यांना थेट आव्हान दिले आहे. अब्रुनुकसानीची नोटीस आहे, की खंडणीसाठीचं पत्र, असा सवाल उपस्थित करत आपल्या या बेकायदेशीर नोटीसला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ, असं अखिल चित्रे यांनी म्हटलं आहे. तसेच निलेश लंके ही लढाई आपण सुरु केली, पण ही लढाई आम्हीच संपवणार हे निश्चित, असे आव्हानही दिले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button