तुम्ही देशाला खरोखरच कॅशलेस केले! मोदींना रिचा चड्ढाचा टोमणा

मुंबई :- अद्यायावत तंत्रज्ञानामुळं सरकार आणि सामान्य माणूस यामधील दरी आता पहिल्यापेक्षा कमी झाली आहे. अन् याचा थेट परिणाम काळ्या पैशांवर झाला. डिजिटल करंसीमुले देशातील काळा पैसा कमी झाला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) केले. त्यांच्या या भाषणावर अभिनेत्री रिचा चड्ढाने (Richa Chadha) टोमणा मारला – खरोखरच देशाला तुम्ही कॅशलेस केले.

‘नासकॉम टेक्नॉलॉजी अँड लिडरशीप फोरम’ कार्यक्रमात मोदींनी देशाच्या आयटी सेक्टरचे कौतुक केले. सरकारने तंत्रज्ञानाचा वापर करुन देशात अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या. प्रशासकीय कामांत वेग आला. असे म्हणून मोदींनी देशातील काळ्या पैशांवर भाष्य केले. डिजिटल करंसीमुळं देशातील काळा पैसा कमी झाला असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या भाषणावर अभिनेत्री संतापली. हे अत्यंत प्रमाणिक विधान आहे. खरोखरच तुम्ही देशाला कॅशलेस केले, असे ट्विट करून तिने मोदींना टोमणा मारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER