राजकारण करण्यासाठी तुम्हालाच लागते बाळासाहेबांची गरज; संजय राऊतांना मनसेचा टोमणा

Sanjay raut - Akhil Chitre - Maharashtra Today

मुंबई : एका मुलाखतीत, ठाकर बंधू एकत्र येतील का? या प्रश्नाच्या उत्तरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ‘परमेश्वरास ठाऊक’ या दोनच शब्दांत उत्तर दिले. यावर शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) टीका केली – परमेश्वर हा कुठल्याही पक्षाचा मेंबर नसतो, तो कधीच मध्यस्थाची भूमिका घेत नाही. त्यामुळे अशा गोष्टी या परमेश्वरावर सोडून द्यायच्या नसतात. जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो त्याला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. राजकारण हे आपले आपण करायचे असते.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांवर आरोप करण्याची सध्या फॅशन, त्याच्याशिवाय बातम्याच होत नाही : संजय राऊत 

यावर मनसेचे (MNS) नेते अखिल चित्रे (Akhil Chitre) यांनी ट्विट करुन संजय राऊत यांना टोमणा मारला – राजकारण हे आपले आपण करायचे असते. संजय राऊत यांचे हे म्हणणे अगदी बरोबर आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे स्वत:चे राजकारण स्वत:च करतात. पण तुम्हाला मात्र निवडणुकीत राजकारण करण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची गरज लागते! तसेच वारंवार आमचे दैवत परमेश्वर म्हणून त्यांच्यावर विसंबून राजकारण करावे लागते.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button