करोनाच्या लसीविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित हव्यातच !!!

COVID-19 Vaccination

भारतात लाखो जणांना कोरोनाची (Corona) लागण झाली. वर्षभर कोरोनाशी झुंज दिल्यानंतर आजपासून लसीकरणाला (Vaccination) भारतात सुरुवात होत आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानंतर पुन्हा भीतीचं सावट निर्माण झालं असलं तरी लसीकरणाला झालेली सुरुवात दिलासादायक आहे. कोरोनाची लस कशी मिळेल, नोंदणी कशी करायची. त्यासाठी किती रुपये घेतली जातील. इत्यादी प्रश्न तुमच्या मनात असतील तर चिंता करु नका. या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत.

कुणाला मिळेल सर्वात आधी लस?

मार्गदर्शक तत्त्वांनूसार सर्वात आधी कोव्हीड १९ लस आरोग्य कर्मचारी म्हणजेच डॉक्टर, नर्स, पॅरामेडीक्स आणि आरोग्याशी संबंधित लोकांना दिली जाईल. सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा विचार केल्यास हा आकडा ८० लाखांपर्यंत जातो.

यानंतर २ कोटी फ्रंटलाइन वर्कर्स म्हणजे पोलिस, पॅरामिलेट्री फोर्सेस, सॅनिटायझेशन वर्कर्स यांना ही लस देण्यात येईल. तिसऱ्या स्थानावर ५० पेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्ती तसेच ज्यांचं वय ५० पेक्षा कमी आहे पण गंभीर स्वरुपाचे आजार आहेत त्यांना ही लस देण्यात येईल. भारतात अशा लोकांचा आकडा २७ करोड आहे. ५० वर्षाहून कमी वय असलेल्या आणि कोरोनाची लक्षण नसणाऱ्यांचा सामावेश सुरुवातीच्या लसीकरण अभियानात करण्यात आलाय. वरील तिन्ही गटांचे लसीकरण झाल्यानंतर उर्वरीत जनतेस कोरोनाची लस देण्यात येईल.

कोणत्या कोरोना लशीला भारतात मिळालीये परवानगी?

ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडीयानं (डीसीजीआई) (DCGI) कोरोनावरील उपचारासाठी दोन लसींच्या वापराला हिरवा कंदिल दाखवलाय. त्या आहेत कोव्हिशील्ड आणि कोवॅक्स.

कोव्हीशील्ड ही ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठात बनलेली लस आहे. तर कोवॅक्स ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे. कोवॅक्सचा प्रचार ‘स्वदेशी’ लस म्हणूनही सुरु आहे. ऑक्सफर्डच्या कोव्हीशील्डची निर्मिती पुण्याच्या सिरम इन्सटीट्यूटमध्ये झालीये. तर कोवॅक्सला हैद्राबादस्थित भारत बॉयोटेक कंपनीने बनवलंय.

कोरोनाची लस घेण्यासाठी कशी करायची नोंदणी ?

कोरोनाची लस घेण्यासाठी भारत सरकारच्या CoWIN एपवर स्वतःच्या नावाची नोंदणी करावी लागेल. जर तुम्ही तिथं नोंदणी केली नाही, तर कोरोनाची लस मिळणं कठिण जाईल.

इथं नोंदणी केल्यानंतर तुमच्या फोन नंबरवर मेसेज पाठवला जाईल. लस घेण्याची तारीख, केंद्र आणि वेळेचा उल्लेख केलेला असेल. नोंदणीसाठी तुमचा कोणताही फोटो आइडी म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्राइव्हिंग लाइसेन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, बँक पासबूक इत्यादींचा वापर करता येतो. ही कागदपत्र नसतील तर आमदार, खासदाराकडून दिलं जाणारं ओळखपत्र, किंवा संबंधित ठिकाणी कामाला असाल तिथलं ओळखपत्रही चालेल.

मोफत मिळेल का कोरोनाची लस?

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलंय की लस सर्वांना मोफत दिली जाईल. पण नंतर याच्या किंमत किंवा मोफत वितरण संबंधी कोणतीच माहिती समोर आली नाही. याआधी कोव्हीशील्डच्या किंमतीबद्दल बोलताना सीरम इन्स्टीट्यूटचे सीईओ नादर पुनावालांनी सांगितलं की २०० ते ३०० रुपये किंमत पडेल. जवळपास ३ डॉलरच्या आसपास याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारानूसार ठेवण्यात आलीये.

खासगी रुग्णालयात देखील कोरोनाची लस देण्याच्या विचारात भारत सरकार आहे. पण तिथं लसीसाठी दुप्पट किंमत द्यावी लागेल. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण सागंतात, “बीबीआयएलच्या कोवॅक्सचे १६.५ लाख डोस केंद्र शासनाला मोफत देत असून. उर्वरीत ३८.५ लाख डोससाठी भारत बॉयोटेक सरकारकडून २९५ रुपये प्रतिडोस घेणार आहे.

अमेरिकेच्या फायझर कंपनीने तीन श्रेणीत कोरोना लसीची किंमत ठेवल्याचे सांगितलं जातंय. ज्यात विकसीत देश, विकसनशील देश आणि मागास देशांमध्ये ही लस वेगवेगळ्या किंमतीत मिळेल.

Disclaimer:- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER