
मुंबई : राजकीय साठमारीत आपण जनतेचे नुकसान करतो याचे भान केंद्रातील सत्तेने ठेवले नाही तर रशियातील राज्ये फुटली तसे आपल्या देशात घडायला वेळ लागणार नाही, असे म्हणत शिवसेनेचे (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज रोखठोक सदरातील लेखातून केंद्र सरकारवर टीका केली. यावर भाजपा नेते आ. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी प्रत्युत्तर टोमणा मारला, तुम्ही सत्तेसाठी लाचार होऊन हिंदुत्व सोडले असले तरी लोकांच्या मनात ते जिवंत आहे. त्यामुळे फार चिंता करू नका.
“शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात भारतातील राज्येही रशियासारखी फुटतील…त्यांना मला सांगावेसे वाटते की, हा देश हिंदुत्वाच्या मजबूत धाग्यांनी बांधला गेलाय. तुम्ही सत्तेसाठी लाचार होऊन हिंदुत्व सोडले असले तरी लोकांच्या मनात ते जिवंत आहे. त्यामुळे फार चिंता करू नका…” असे भातखळकर ट्विटमध्ये म्हणालेत.
शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात भारतातील राज्यही रशिया सारखी फुटतील…
त्यांना मला सांगावेसे वाटते की हा देश हिंदुत्वाच्या मजबूत धाग्यांनी बांधला गेलाय. तुम्ही सत्तेसाठी लाचार होऊन हिंदुत्व सोडले असले तरी लोकांच्या मनात ते जिवंत आहे. त्यामुळे फार चिंता करू नका…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 27, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला