झुंज कशी द्यायची हे आपल्याला माहित आहे ; पार्थच्या समर्थनार्थ पद्मसिंह पाटलांचा नातू मैदानात…

Parth Pawar - Malhar Patil

उस्मानाबाद :- राष्ट्रवादीचे (NCP) प्रमुख् शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर जाहीर टिप्पणी केल्यानंतर राष्ट्रवादी विरोधकांनी पार्थ पवार (Parth Pawar) यांची साथ देण्याचे ठरवलेले दिसत आहेत. तसेच पवारांचे शत्रूही पार्थच्या समर्थनार्थ एकवटेलेले पाहायला मिळत आहेत.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी नातवाला जाहीर फटकारल्यानंतर पवारांचे जूने शत्रु पद्मसिंह पाटील (Padamsinh Patil) यांचे नातू आता पार्थच्या समर्थनार्थ मैदानात आले आहे.

माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील (Malhar Patil) यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. तुम्ही जन्मजात लढवय्ये आहात, असे म्हणत मल्हार यांनी पार्थ यांना समर्थन दिले आहे.

‘आपण जन्मजात लढवय्ये आहात, हे मी बालपणापासून पाहिले आहे. मला तुमचा अभिमान आहे. आपण उस्मानाबादचे आहोत, आणि झुंज कशी द्यायची हे आपल्याला माहित आहे’ असे मल्हार पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. माझी पोस्ट राजकीय नसून, पार्थ पवार यांच्या प्रेमापोटी व आपुलकीने केल्याचे स्पष्टीकरण मल्हार पाटील यांनी दिले.

शरद पवार – पद्मसिंह पाटील नातेवाईक –

मल्हार पाटील हे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू, तर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र आहेत. पार्थ पवार यांच्या आई सुनेत्रा पवार या डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. त्यामुळे मल्हार पाटील आणि पार्थ पवार यांचे काका-पुतण्याचे नाते लागते. मात्र वयात फारसे अंतर नसल्याने दोघेही चांगले मित्र आहेत. पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबाने गेल्याच वर्षी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला.ते उस्मानाबादचे आमदार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER