… तुम्ही फक्त खुर्च्या, स्टेज लावा; निलेश राणेंचा शिवसैनिकांना टोमणा

Nilesh Rane

मुंबई :- अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांना शिवसेना (Shivsena) आपल्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. या संदर्भात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ऊर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांना फोनवरून संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावरून भाजपाचे (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना टोमणा मारला – तुम्ही फक्त खुर्च्या, स्टेज लावा!

ऊर्मिला मातोंडकर यांनी २०१९ ला काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली. हरल्या.  आणि आता शिवसेनेने त्यांना विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून पाठवण्याची तयारी केली आहे. यावरून, शिवसेनेत कार्यकर्त्यांना किंमत नाही, असे सूचित करताना निलेश राणे यांनी टोमणा मारला – जुन्या शिवसैनिकांनो, तुम्ही फक्त खुर्च्या, स्टेज लावा, आंदोलन करा, केसेस घ्या. तुमची किंमत नाही की तुम्हाला पक्ष आमदारकी देईल. एक वेळ अशी येईल की एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील; पण शिवसेनेत नसतील!

ही बातमी पण वाचा : ठाकरे सरकार म्हणजे नुसते बोलबच्चन, मंत्रालयही दिल्लीत हलवा : निलेश राणे 

ऊर्मिला मातोंडकर यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उत्तर मुंबईतून निवडणूक लढवली. भाजपाचे गोपाळ शेट्टींनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काही महिन्यांतच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतरही काँग्रेसने त्यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी उमेदवारी देऊ केली होती. मात्र आपल्याला विधानपरिषदेच्या जागेसाठी रस नाही, असे उत्तर ऊर्मिला मातोंडकर यांनी दिल्याचे कळते. मात्र तरीही त्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार असाव्यात यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER