बकेट लिस्ट बनवायलाच हवी

bucket list

हाय फ्रेंड्स ! मागच्या आठवड्यात एका मैत्रिणीला कॉल केला. खूप दिवसात बोलणं झालं नव्हतं त्यामुळे दोघींनाही खूप फ्रेश वाटलं बोलून. तिच्याकडे गडबड सुरू होती. दिवाळी जवळ आल्याने सगळ्यांच कामात असणार. मी तिला म्हटलं, “ठीक आहे. आपण नंतर बोलू. तू कामात असशील तर”. ती म्हणाली,” अगं काही नाही ! ढोर मेहनत आहे, झालं! काढला तर असतो, नाहीतर कधीच नसतो.” मला तिच्या बोलण्यात किंचीत कंटाळा आल्याची भावना, खंत जाणवत होती. त्यानं मी अस्वस्थ झाले.

तसही ह्या कोरोना मुळे या वर्षात एकूणच घरच्या स्त्री वरचा कामाचा भार वाढलेला आहे. त्यातून बाहेर पडायचं नसल्याने चार भिंतीच्या आत राहून ती कंटाळली देखील आहे. मैत्रिणी नाहीत की गप्पा नाहीत. त्यातून आता ऑफिस सुरू झाल्याने नोकरी करणारी स्त्री बाहेर पडू लागली. पण गृहिणीच काय? ती नेहमीसारखीच कायमस्वरूपी गृहीत धरली गेलेली.

कॅरोल लाईन आणि जिन हार्पर ने लिहिलेली ही गोष्ट. 1959 सालातली. जीन हार्पर ही मुलगी तिसऱ्या वर्गात शिकणारी. तिला वर्गात निबंधाचा विषय दिल्या जातो, तुम्ही मोठेपणी कोण होणार? जिंनचे वडील त्या प्रांतातील पिकांवरची कीड मारण्याचे औषध फवारणी करणारे विमान चालक. तिच्याही बालजीवाला विमान आणि उडण्याचा ध्यास होता. तिचे ते स्वप्न होते. फवारणी करायची होती तिला आणि हवाई छत्रीच्या साह्याने खाली तरंगत यायचे होते. विमान चालक व्हायचे होते! पण फूस्स ! शिक्षिकेने शेरा लिहिला की ही तर परिकथा आहे कारण ही कामे स्त्रियांची नव्हेत म्हणे. बिचाऱ्या जीनची स्वप्ने चुरगळली गेली. ती हिरमुसली झाली. हा प्रसंग तिच्या विस्मृतीत गेला नंतर नवीन टीचरने एका तिला प्रोत्साहन दिलं आणि ती पहिली महिला विमान बनली. एका उत्तेजनपर शब्दांनी किमया केली होती.

पण अजूनही स्त्रियांच्या स्वप्नाबाबत, तिच्या छोट्या छोट्या इच्छांबाबत बरेच ठिकाणी खूप उदासीनता दिसून येते. झाली तर टीकाच होत राहते .प्रेरणेचा आणि प्रशसेचा मात्र शुष्क खडखडाट असतो. आपण मागे बघितल्याप्रमाणे मनमोकळी दाद किंवा प्रशंसा तिला आयुष्यभर ही मिळत नाही (अपवाद वगळता) तिचे स्वप्न पूर्ण झाल्याने येणारी आत्मसन्मानाची भावना, दिलखुलास दाद, जशी आहे तशी स्वीकारली जाणे ,या बेसिक गरजा पूर्ण होतात असं नाही. स्वप्न म्हणजे नेहमी विमान चालवण्यासारखीच असतात असं नाही. तर अगदी मामुली आवडी जोपासणे, काही ठिकाणी प्रवास करण्याची इच्छा, नवीन काही शिकण्याची इच्छा, ज्यात तिला स्वतःला रंगून जाता येईल दीड-दोन तास ,अशी एखादी गोष्ट. डान्स, पेंटिंग, समाजकार्य, अगदी घोडेस्वारी, नेमबाजी, आदिवासी पाडावर काम करणे, काहीही! नाहीतर चक्क फक्त बाजारात भटकणे, मैत्रिणीशी गप्पा, जोरदार खळखळून हसणे यासाठी फार काही लागत नाही.

पण मुळात वातावरणाच असं असतं की तीला काय आवडतं? करावसं वाटतं हे तिचं तेच विसरून जाते आणि कालांतराने घरातली कामं सांभाळून पुढे काही करायचा उत्साह हळूहळू मावळत जातो. टेरी जॉन्सन ची एक कथा आहे. व्हॉट डू यु वॉन्ट टू बी ?या नावाची .पटकथेची नायिका म्हणते कल्पनांचे उडान हे पतंगा पेक्षाही जास्त असते हे किती सत्य आहे. अचानक धनलाभाचा समय आला असं मला वाटतं. घडलं होतं की नेहमीप्रमाणे मी माझ्या खोलीत छोट्या मुलीला शाळेसाठी तयार करत होते. तेवढ्यात माझी मोठी सहा वर्षाची अलिसा आता आली. आणि माझ्या बाजूनी बसून विचारू लागली, “आई तू मोठी झाल्यावर कोण होणार ?”मी म्हटलं” हा ss काय बरं? मला वाटत मोठी झाल्यावर मला आई व्हायला आवडेल.

“यावर ती म्हणते,”तू आई तर आहेसच, तुला आई नाही होता येणार.” “मग मला चर्चचा मुख्य धर्मोपदेशक व्हायला आवडेल.”

” अग! तू त्यांच्यातलीच आहेस की! असं नाही बाबा चालणार मला. नीट उत्तर दे की , तुला कोण व्हायला आवडेल?” तुला जे करावेसे वाटेल ते तू होऊ शकशील ना. छोटी म्हणाली.

” पण सोने आता नाही काही सुचत मला, काही समजत नाही मला. मी हार मानली “!कंटाळून आलीसा उठून गेली. पण या अनुभवांनी मी हादरून गेले. विचारात पडले .तिच्या चिमुकल्या नजरेने मी अजून कोणीही बनू शकते ? माझा आत्ताच वय, माझ्या दोन पदव्या, माझ कार्यक्षेत्र ,दोन मुली, संसार, नवरा या कशाचे महत्त्व तितकं वाटत नाही? खरंच मी अजून स्वप्ने बघू शकते ?व चांदण्यान पर्यंत पोहोचू शकते?. मी अवकाश यात्री, पियानो वादक किंवा गायिका बनू शकते ?अजूनही मी वाढू शकते व कोणीतरी बनू शकते. नंतर लेखिका आपल्याला विचारते तुम्ही मोठे झाल्यावर कोण बनणार ?

हाय फ्रेंड्स! “एज इस ओनली ए नंबर !”यावर माझा विश्वास आहे. अशा कितीतरी जणींचा आपल्याला परिचय दररोज होत असतो की त्यांच्यापुढे वयाने हार मानलेली आहे. मध्यंतरी एका महिलेचा परिचय बघितला. वयाच्या साठाव्या वर्षी तिने ट्रेकिंगला सुरुवात केली आणि 65 वर्षीपर्यंत अतिशय दुर्गम असे अनेक ट्रेक्स केले. अशाच एका महिलेचा परिचय मध्ये वाचनात आला ज्यांनी ग्रॅज्युएशन झालं, नंतर केव्हा तरी अनेक खटपटी करून एमबीबीएसची पदवी चक्क घेतली .तेही मध्ये अनेक वर्षांची गॅप गेल्यानंतर. थोडक्यात त्यांना जे आवडतं ते त्यांनी केलं. नेहमी पैशाची आवश्यकता हा भाग नसतोच . स्वअस्तित्वासाठी प्रत्येक गोष्टीची गरज असते असं नाही .पण कामातून चेंज ही सुद्धा मोठी गरज असू शकते ! आज अनेक मैत्रिणी अशा आहेत की ज्यांना सकाळ व संध्याकाळचा स्वयंपाक आजन्म चुकलेला नाही. (हे अशक्य वाटते आजच्या काळात पण ते सत्य आहे) ऑफिसच्या कामातून थोडी तरी सुट्टी मिळते पण किचन तर कधीच बंद नसत.

प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनात एक स्वप्न दडलेलं असतं. जे तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याची, अगदी तारकांच्या उंचीपर्यंत जाण्याचे बळ तुम्हाला देत. मध्यंतरी माधुरी दीक्षित चा पिक्चर होता ,”बकेट लिस्ट! “आपल्याला करावेसे वाटणारे ,आणि अपूर्ण असलेल्या गोष्टींची यादी नायीका करते आणि ती पूर्ण करते. तेव्हा आता तरी जागे व्हायला हवे. आपापली बकेट लिस्ट बनवायलाच हवी.

अंतर्मनातील घडलेल्या स्वप्नानपर्यंत पोहोचण्यासाठी पंखांच्या शोधात जावे लागेल. त्यासाठी मुळात स्वप्न बघायची सवय करा. आपल्याला आपण जसे व्हावेसे वाटते ते दृष्टीसमोर आणा. परत त्या दृश्यावर लक्ष द्या.माझे स्वप्न वास्तवात उतरायचे असेल तर ते विचार माझ्या हाडीमासी भिनायला हवे. एखादीला बघितले की दोन दिवस खुमखुमी राहते स्लिम फिट बनायची. आणि मग स्वप्न विरते असं नको व्हायला.

फ्रेंड्स ! यासाठी आतून माझं मन काय सांगते हा प्रश्न स्वतःला विचारा. अडसर कुठे येतात आहेत? ते मीच तर निर्माण केलेले नाही? की वास्तविक आहेत ? बरेचदा माझी विल पॉवर कमी असते. अशावेळी अडथळ्यांचे डोंगर उभे राहतात. की माझा आत्मविश्वास हरवला आहे? उत्साहाच हरवलाय का ?

दिवाळी जवळ आली आहे .घराची साफसफाई तर तुम्ही जीव ओतून करत असालच! आपल्या मनावर आलेली उदासीनतेची जळमटे केव्हा काढणार आहात? लवकर सुरू करू या! मग दिवाळीत तुमच्या प्रसन्नतेने ,तेच घर कसं जळून जातं ते बघाल ! तेव्हा लागुया तर कामाला !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER