‘माझ्या ताकदीची तुम्हाला कल्पना नाही !’ केस मागे घेण्यासाठी मुंडेंकडून शर्मा कुटुंबावर दबाव

- तक्रारदार महिलेच्या वकिलाचा आरोप

Dhananjay Munde

मुंबई :- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणूच्या भावाला आणि वहिनीला धनंजय मुंडे यांनी धमकी दिली आहे की, तुझ्या बहिणीला तक्रार मागे घ्यायला लाव. नाही तर तुझ्या परिवाराला खंडणीच्या गुन्ह्यात आतमध्ये टाकेन. तुम्हा लोकांना माझी ‘पॉवर’ माहिती नाही, अशी तक्रार रेणूच्या वकिलांनी केली आहे.

रेणू शर्माचा डीएन नगर पोलीस स्थानकांमध्ये जबाब नोंदवण्यात येत आहे. चार तासांपासून चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या दरम्यान, माध्यमांनी रेणूच्या वकिलांशी चर्चा केली असता त्यांनी हा गंभीर आरोप केला. पोलीस आम्हाला सहकार्य करत नाहीत. अर्धेच स्टेटमेंट्स घेतले आहे. यासाठी आम्ही कोर्टात जाऊ, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणालेत, चार  दिवस झाले तरी अद्याप FIR दाखल केला  जात नाही. धनंजय मुंडे हे दबाव टाकत आहेत. रेणू विरुद्ध खोट्या केसेस केल्या जात आहेत. माझ्या ताकदीची तुम्हाला कल्पना नाही, बहिणीला केस widraw करायला सांगा, नाही तर सगळ्या कुटुंबाला खंडणी प्रकरणात अडकवू, असे धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना धमकावले आहे.

दरम्यान, आज रेणू यांचे अर्धेच स्टेटमेंट झाले. उद्या ११ वाजता पुन्हा स्टेटमेंट रेकॉर्डसाठी बोलावले आहे. या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे आणि आरोप समोर होत असताना रेणू शर्मावर धनंजय मुंडेंसह आणखी एका नेत्याने आरोप केले आहेत. भाजपाचे नेते कृष्णा हेगडे (Krishna Hegde) यांनी रेणू शर्मा (Renu Sharma) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुंबई पोलिसांना यासंदर्भात सविस्तर पत्र लिहून माहिती दिली आहे.

कृष्णा हेगडे यांनी पत्रात आरोप केला आहे की, रेणू शर्मा यांनी मलाही ‘रिलेशनशिप’च्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. २०१० पासून रेणू मला सतत कॉल आणि मॅसेज करत होती. मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होती.

याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात रेणू शर्मा यांचे वकील म्हणालेत की, याबद्दल अद्याप रेणू यांच्याशी चर्चा झाली नाही. त्यांच्याशी बोलून याचे उत्तर देईन. (Dhananjay Munde threatens Renu Sharmas family Serious allegations by lawyers)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER