जामिनावर सुटलेला आहात, जोरात बोलू नका अन्यथा महागात पडेल ; पाटलांचा छगन भुजबळांना टोला

Chandrakant Patil - Chhagan Bhujbal - Maharashtra Today
Chandrakant Patil - Chhagan Bhujbal - Maharashtra Today

मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने मुसंडी मारली आहे . यावर छगन भुजबळांनी बंगालच्या निकालावरुन भाजपवर टीका केली होती. आता पलटवार म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मंत्री छगन भुजबळांनाच (Chhagan Bhujbal) इशारा दिला आहे. छगन भुजबळांनी पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी, जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळं तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल पंढरपूर, आसाम, पुद्दुचेरीवर बोला, असे ते म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये ममता जिंकल्या तर ईव्हीएम बरोबर आहे आणि आसाममध्ये भाजप जिंकली तर ईव्हीएम चूक आहे, असं होत नाही. बंगालमधील पराभवाचं दु:ख तर वाटणारच. आम्ही कुठलीही गोष्ट कार्यकर्ते म्हणून करतो. आम्ही निवडणुका फार गांभिर्याने घेतो. पराभव जरी झाला असला तरी भाजप विरोधात सगळे एकत्र आले होते हे लक्षात घ्यायला हवं. वर्षानुवर्षे तिथं सरकारमध्ये असलेले नाही च्या बरोबरीने दिसत आहेत, असे पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button