
कोल्हापूर : आमच्या जातीवर अन्याय होतो, म्हणून जातीच्या आधारावरच आरक्षण असले पाहिजे. तुम्ही जात व्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडतो, असे आव्हान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पत्रकार परिषदेत दिले.
ते म्हणालेत, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण (Maratha Reservation) हवे आहे. पण आर्थिक निषकावर आरक्षण देता येत नसल्याने जातीच्या आधारावच आरक्षण असावे.
जातीनिहाय जनगणना हवी
देशात कोणत्या जातीचा किती टक्का आहे, हे आता समजत नाही. प्रत्येक जातीची जनगणना व्हायला पाहिजे. त्यामुळे २०२१ ची जनगणना जात निहाय होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) भेट घेणार आहे, असे आठवले यांनी सांगितले.
कृषी कायद्यांवरुन डोकी भडकवण्याचे काम
केंद्र सरकारने मंजूर केलेले तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. पण काही संघटनांकडून जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना सरकारविरोधात भडकवले जात आहे, असा आरोप रामदास आठवले यांनी केला. संघटनांनी हटवादी भूमिका सोडली तर केंद्र सरकार चर्चेला तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला