तुम्ही सीएमपदाचे मटेरियल, राज्यमंत्र्यासारखी कृती नको : सुधीर मुनगंटीवार

Eknath Shinde - Sudhir Mungantiwar

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत भाजपाचे (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांची चर्चा झाली. या चर्चेमुळे सुधीर मुनगंटीवार यांनी एक नवे वक्तव्य करून राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ‘तुम्ही सीएम मटेरियल आहे.’ असे म्हटले.

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. कालदेखील सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भ विकास वैधानिक महामंडळाच्या मुद्यावरून प्रश्न आणि शंका उपस्थित केला. महाविकासआघाडीच्या नेत्यांना भंडावून सोडले.

यवतमाळच्या आर्णी येथील गैरव्यवहारप्रकरणात एका सरकारी अधिकाऱ्याला राज्य सरकारकडून वाचवण्यात येत आहे, असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला. “१५ महिने उलटूनही या अधिकाऱ्याची चौकशी झालेली नाही. यावर निलंबनाची कारवाई झालेली नाही.” असे मुनगंटीवार म्हणाले. सरकार कोणालाही पाठिशी घालत नाही. चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. “तुमच्यात मुख्यमंत्री होण्याची (सीएम मटेरियल) क्षमता आहे. त्यामुळे तुम्ही एखाद्या राज्यमंत्र्याप्रमाणे वागू नका.” असे मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे यांना म्हटले.

सभागृहात भाजपा आक्रमक

वीजबील वाढ आणि वीज कनेक्शन तोडण्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतली. यादरम्यान, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचा वार्षिक २०१७-१८ अहवाल सभागृहात मांडला. त्यानंतर विभागाचे विविध अहवालही टेबलावर ठेवले.

शिवसेना अंतिम श्वासापर्यंत शत्रू नाही

भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारे वक्तव्य केले. शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू असणार नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामध्ये नक्की शिजतंय, असा प्रश्न अनेकांना पडला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER