शेजारच्या खाटल्यावर जावून संसार करता येत नाही : सदाभाऊ खोत

Sadabhau-Khot

कोल्हापूर : अतिवृष्ट शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी करणाऱ्या महाराष्ट्र शासनावर आज माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी बोचरी टीका केली. शेजाऱ्याच्या खाटल्यावर जाऊन संसार करता येत नसतो, बाळंतपण करता येत नाही, अशा शेलक्या शब्दात खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवरचा समाचार घेतला. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून, शेतकऱ्यांना तातडीने २५ हजारांची मदत जाहीर करावी, यामागणीसाठी खोत यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात तारेवाडी येथे शेतात आंदोलन केले. त्यावेळी ते बोलत होते.

तारेवाडीमध्ये तर ढगफुटीसदृश पाऊस पडून भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याचा आढावा घेऊन नुकसानग्रस्त शेतकरी आणि रयतक्राती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी पाहणी केली. यावेळी खोत म्हणाले, पावसामुळे शेतीची मोठे नुकसान झाले आहे. गतसाली महापुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, त्यांना प्रतिहेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करून, तातडीची २५ हजारांची मदत घ्यावी, अशी मागणी केली. तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली. शेतकऱ्यांना आधार देण्याची भूमिका राज्य सरकारने घ्यावी. त्यांचे वीजबिल माफ करून दिलासा देण्याचे गरज आहे. कोरोनाचे कारण न देता मदत जाहीर करावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER