तुम्ही उधार घ्या किंवा चोरी करा पण राज्याला ऑक्सिजन पुरवठा करा; हायकोर्टाने केंद्राला फटकारले

Maharashtra Today

नवी दिल्ली : वाढत्या कोरोना (Corona)रुग्णांमुळे महाराष्ट्र आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने (High Court)बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारला(Center Govt) चांगलेच फटकारले. “तुम्ही कोणासमोरही गयावया करा, उधार घ्या किंवा चोरी करा पण दिल्लीत कुठूनही ऑक्सिजन घेऊन(supply oxygen ) या. आम्ही रुग्णांना अशाप्रकारे मरताना बघू शकत नाही. ऑक्सिजनचा पुरवठा करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे.” असे उच्च न्यायालयाने म्हटले. सोबतच कोर्टाने ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनाही खडेबोल सुनावले. यावेळी तब्बल २१.५ लाख रुग्णांवर उपचार सुरू आहे.

केंद्राला लोकांच्या जीवापेक्षा उद्योगांची चिंता आहे. याचा अर्थ आपातकालीन परिस्थितीमध्येही केंद्रासाठी लोकांचे जीव महत्त्वाचे नाहीत का, असा सवाल न्यायालयाने विचारला. वाढत्या रुग्ण संख्येमुळे केंद्राकडे ऑक्सिजनची मागणी सातत्याने वाढत आहे. ही गरज पूर्ण करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. हा केवळ एकट्या दिल्लीचाच प्रश्न नाही. मात्र, संपूर्ण देशात ऑक्सिजन पुरवण्यासाठी केंद्र काय करत आहे, याची माहिती द्यावी, असे आदेश हायकोर्टाने दिले.

टाटा स्टीलने आपल्या प्रकल्पांमध्ये तयार होणारा पूर्ण ऑक्सिजन वैद्यकीय सेवांसाठी देण्याचा निर्णय घेतला. मग दुसऱ्या खासगी कंपन्या असे का करू शकत नाहीत? त्यांच्यासाठी माणुसकीची काहीच किंमत नाही का? केंद्र सरकारने स्टील आणि पेट्रोलियम कारखान्यांत तयार होणारा ऑक्सिजन लोकांचा जीव वाचवण्यासाठी वापरावा, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

ही बातमी पण वाचा : गोंधळलेला राजा आणि बेफिकीर प्रशासन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button