तुमचा गुलाबरावांवर विश्वास पण नाथाभाऊंवर नाही : चंद्रकांत पाटील

Chandrakant patil-Eknath Shinde-Gulabrao Patil

मुंबई : मागील काही दिवसांपासून भाजपचे (BJP) माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पक्षांतराची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (Shiv Sena) प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जळगावात खडसेंच्या पक्षांतराबाबत सूचक विधान केले. ‘सध्या एकनाथ खडसे कोणत्या पक्षाशी संपर्कात आहेत, याची मला माहिती नाही. पण ते पक्षांतर करतील हे सत्य आहे’, असे सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केले.

गुलाबराव पाटील याच्या वक्तव्याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, नाथाभाऊंनी वारंवार सांगितले आहे की ज्या पक्षात मी वाढलो, मोठा झालो त्या पक्षाचे नुकसान मी करणार नाही. मात्र, तरीही तुमचा गुलाबरावांवर विश्वास आहे, आमच्या नाथाभाऊंवर नाही, असा उलट सवाल चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला .

ही बातमी पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER