तेव्हा मला मुंबई सोडून जा म्हणणारे राजदीप आता माझं समर्थन करतायेत – कंगना रणौत

kangana to rajdeep

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने ( kangana Ranuat) मुंबईचा पाकव्याप्त काश्मीर म्हणून उल्लेख केल्यानंतर मराठी इंडस्ट्री तसेच, बॉलिवूड, राजकीय नेते, सोशल मीडियाकर्मी सारेच तिच्यावर भडकले. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई (Rajdeep Sardesai) यांनीही कंगनाच्या या विधानाचा विरोध केला होता.

तसेच, ट्विटरवरून मुबईला भले-बुरे म्हणाणा-या कंगनाला मुंबईच सोडून जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यानंतर कंगनावर अनेक स्तरांतून टीका होत असताना पाहून आणि तिला हिंसाचा-याच्या धमक्या मिळाल्यानंतर राजदीप सरदेसाई यांनी प्रकरण अधिक चिघळण्यापूर्वी कंगनावर असे आरोप करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले होते.

तसेच तिला तिचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे असे म्हटले होते. त्यावर आता कंगना रणौतने राजदीप सरदेसाई यांना त्यांच्याच तेव्हाच्या शब्दांची आठवण करून देत, तेव्हा व्हाटस्अप मेमेच्या माध्यमातून मला मुंबई सोडून जा म्हणणारे राजदीप आता माझं समर्थन करत आहेत आणि माझ्या भाषास्वातंत्र्याला पाठिंबा देत आहेत, असे ट्विट कंगनाने केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER