‘तुम्ही भाजपचे खासदार, तरीही मोदींना भेटत नाहीत?’ या प्रश्नाला सुब्रमण्यम स्वामींचे उत्तर

Subramanian Swamy - Narendra Modi

नवी दिल्ली :- कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) हे सतत केंद्र सरकारवर जहरी टीका करताना दिसून येत आहेत. भाजपचे (BJP) खासदार असूनही ते नेहमीच केंद्र सरकारविरोधात जाहीरपणे नाराजी व्यक्त करतात आणि त्यांना विरोधही केला जात नाही. कोरोना संकट, लसीकरण ते चीन या साऱ्या आघाड्यांवर त्यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारला कोंडीत पकडलेले आहे. यामुळे ट्विटरवर एका युजरने त्यांना ‘तुम्ही तर भाजपाचे खासदार, मग मोदींना भेटत का नाही?’ असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी या प्रश्नावर उत्तर दिले.

युजरच्या या प्रश्नावर स्वामींनी आपण का पंतप्रधानांवर नाराज असतो याचे उदाहरण दिले आहे. एका फोनवर पंतप्रधान त्यांना भेटू शकतात. मग एवढी नाराजी का? यावर स्वामी यांनी पाच वर्षांपूर्वीची घटना सांगितली आहे. स्वामींनी उत्तर देताना म्हटले की, पाच वर्षांपूर्वी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता. तो टेलिफोन कॉल त्यांचे अपॉइंटमेंट सेक्रेटरी भावसार यांनी उचलला होता, जो आजपर्यंत तसाच पडलेला आहे. स्वामी यांनी पुढे सांगितले की, जेव्हा मोदी मुख्यमंत्री होते तेव्हा भावसार यांनीच मला कर्णावतीवरून फोन करून अपॉइंटमेंट फिक्स करण्यास सांगितली होती. अमित शहा एप्रिल २०१४ मध्ये माझ्याकडे आले होते. मदत मागणाऱ्या मोदींचा मी एक फोन उचलावा, अशी विनंती घेऊन.

यावर अन्य एका युजरने स्वामींना चांगलेच सुनावले. तुम्हीच मोदींना बळकट करण्यासाठी जबाबदार आहात. मी अशा अनेकांना ओळखतो, ज्यांनी तुमच्या सांगण्यावरून भाजपाला मत दिले. यावर स्वामींनी सांगितले की, मी आजही भाजपालाच मतदान करा असेच सांगेन. कारण हा एकमेव असा पक्ष आहे जो कोणताही परिवार चालवत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button