योगीजी, काही मोहऱ्यांना निलंबित करुन काय होणार आहे? राजीनामा द्या – प्रियंका गांधी

Yogi adityanath-Priyanka Gandhi

नवी दिल्ली :  हाथरस(Hathras) घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेसाठी योगी सरकारवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. त्यातच कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka gandhi)वाड्रा यांनी योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

हाथरस घटनेने देशभारत तमावाचे वातावरण असून गंभीर होत चाललेली स्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री योगींनी मोठी कारवाई केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना केली. याच पार्श्वभूमीवर, SIT च्या प्राथमिक अहवालानंतर हाथरसचे एसपी, डीएसपी आणि अन्य अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईवरून प्रियंका गांधी यांनी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.
योगीजी फक्त पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करून जबाबदारी झटकू नका, राजीनामा द्या अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली आहे.

प्रियांका गांधी म्हणतात, ‘कोणाच्या आदेशांमुळे पीडित मुलगी आणि तिच्या कुटूंबियांना भयानक स्थितीला सामोरे जावे लागले? यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचे कॉल रेकॉर्ड सार्वजनिक करा. त्याचप्रमाणे, केवळ पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करुन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करू नका. काही मोहऱ्यांना निलंबित करुन काय होणार आहे? देश तुम्हाला बघत आहे. योगी आदित्यनाथ तुम्हीही राजीनामा द्या’, अशी मागणी प्रियांका गांधींनी केली.

उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या SIT च्या प्राथमिक अहवालानुसार हाथरसचे जिल्हा पोलीस प्रमुख विक्रांत वीर , पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाईत झाली असून त्यांच्यासह हाथरस पोलीस ठाण्यातील सर्व पोलिसांची आता नार्को पॉलिग्राफ टेस्ट देखील केली जाणार आहे. त्याचप्रमाणे, पीडित मुलीच्या कुटुंबियांचीही नार्को पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे.

ही बातमी पण वाचा : ‘मी आपल्यापेक्षा वरिष्ठ, पीडितेच्या कुटुंबियांना भेटू द्या’, उमाभारती यांचा योगींना सल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER