योगी सरकारने आझम खान यांचे ‘लोकतंत्र सेनानी’ पेंशन केले बंद

लखनौ : मुलायम सिंह (Mulayam Singh) यांच्या समाजवादी पार्टीचे नेते व माजी मंत्री आझम खान (Azam Khan) याना ‘लोकतंत्र सेनानी’ (Loktantra Senani) म्हणून मिळणारे २० हजार रुपये महिना पेंशन योगी सरकारने (Yogi government) बंद केले आहे.

आणिबाणीत तुरुंगवास झालेल्या नेत्यांना उत्तर प्रदेशात ‘लोकतंत्र सेनेनी’ दर्जा देऊन मासिक पेंशन दिले जाते. २००५ साली तत्कालीन मुलायम सरकारने आझम खान यांना ‘लोकतंत्र सेनानी’ घोषित करत पेंशन पेन्शन सुरू केले होते.

सुरुवातीला या पेन्शनची रक्कम ५०० रुपये होती. नंतर ती २० हजार रुपये महिना करण्यात आली. मात्र, आझम खान यांच्यावर अनेक प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल असल्याने योगी सरकारने ‘गुन्हेगारी पार्श्वभूमी’चे कारण देत हे पेंशन बंद करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली.

देशामध्ये १९७५ ला आणीबाणी लागू करण्यात आली त्यावेळी आझम खान अलीगड मुस्लीम युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी संघटनेचे नेते होते. आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते.

रामपूरचे जिल्हा न्यायदंडाधिकारी आंजनेय कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार आझम खान यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यांची संख्या आणि गांभीर्य लक्षात घेऊन त्यांचे पेंशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER