उद्धव ठाकरेंना आव्हान देणं हे योगी आदित्यनाथ यांना जमणार नाही ; शिवसेना नेत्याचे वक्तव्य

Uddhav Thackeray - Yogi Adityanath - Vinayak Raut

मुंबई : योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) मुंबईतील मोठे उद्योजक आणि बॉलिवूड (Bollywood) कलाकारांची भेट घेणार आहेत. दरम्यान ही भेट म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) तर आव्हान नाही ना?, असा सवाल विनायक राऊतांना (Vinayak Raut) माध्यामांकडून करण्यात आला.

उद्धव ठाकरेंना आव्हान देणं हे योगी आदित्यानाथ यांना जमणार नाही. मुंबई आणि फिल्म इंडस्ट्रीचं एक वेगळं नात आहे. त्यामुळे मुंबईचं महत्व कमी नसल्याचे राऊत म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वर्षपुर्तीच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन भाजप (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. याच पार्श्वभूमीवर राणेंनी केलेल्या टीकेला राऊत यांनी प्रतिउत्तर दिले . महाविकास आघाडी हे पाच वर्ष पुर्ण करणार आहे. मात्र माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सत्तापिसासू असल्याचं राऊत यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER