टूलकिट प्रकरण : योगींना सपोर्ट करणाऱ्याला दोन रुपये; खाजगी वाद असल्याचे भाजप प्रवक्त्याचा दावा

Yogi Adityanath

लखनौ : काँग्रेस-भाजपमधील (BJP-Congress) टूलकिट प्रकरण (Toolkit case) आधीच चर्चेत आहे. अशातच आणखी एक टूलकिट प्रकरण समोर आले आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांचा एक कथित ऑडिओ व्हायरल झाला आहे. यात योगींना सपोर्ट करणाऱ्यांना दोन रुपये देणार असल्याचे सांगत आहेत. त्यांच्या सोशल मीडिया टीमचा हा ऑडिओ असल्याचा दावा केला जात आहे. टूलकिट प्रकरणाचा हा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर IT सेलचे प्रमुख मनमोहन सिंह यांना काढण्यात आले आहे. या प्रकरणाचा भाजप आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा काही संबंध नाही, असा दावा भाजपचे प्रवक्ते मनीष शुक्ला यांनी केला आहे.

हा एका खासगी कंपनी संबंधित वाद असल्याचे शुक्ला म्हणाले. “ही ऑडिओ क्लिप निवृत्त सनदी अधिकारी सूर्यप्रताप सिंह यांनी सोशल मीडियावर शेअर केली. हे प्रकरण पसरल्यानंतर सोशल मीडियावर टीमवर प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे. तर, भाजपने या प्रकरणापासून हात काढले आहे. यानंतर कंपनीने कोणाला ठेवावे आणि कोणाला काढावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.” असे भाजपने म्हटले आहे. टूलकिट म्हणजे ज्यामध्ये आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर समर्थन कसे मिळवावे, कोणते हॅशटॅग वापरावे, आंदोलनावेळी जर काही अडचणी आल्या, तर कुठे संपर्क करावा, आंदोलनावेळी काय करावे, काय करू नये, असा सर्व कार्यक्रम या टूलकिटमध्ये सांगितला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button