छत्रपती शिवाजी महाजारांचे नाव ‘मुघल म्युजियम’ला देणार – योगी आदित्यनाथ

yogi adinath

लखनौ : आग्र्यातील निर्माणाधीन ‘मुघल म्युजियम’ला छत्रपती शिवाजी महाजारांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केली.

ते पुढे म्हणाले, उत्तर प्रदेश सरकार राष्ट्रवादी विचारांवर चालणारी आहे. गुलामी मानसिकतेच्या प्रतिकात्मक चिन्हांना दूर करत राष्ट्राप्रती गौरव करणाऱ्या विषयांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आमचे नायक मुघल होऊ शकत नाहीत, छत्रपती शिवाजी महाराजच आमचे नायक आहेत. योगींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने आग्रा मंडळाच्या विकास कार्यांवरील चर्चेदरम्यान याला मंजुरी दिली.

आग्र्याहून सुटका, हा शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतला एक अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल बादशाह औरंगजेब यांच्या आग्रा दरबाराला दिलेली भेट आणि त्यानंतर ते महाराष्ट्रात परतेपर्यंतच्या घडामोडी हा आजवर अनेक इतिहासकारांच्या अभ्यासाचा विषय राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक नाटयमय घडामोडींपैकी हा सर्वात महत्वपूर्ण कालखंड होता. महाराष्ट्रापासून दूर उत्तरेत आणि तेही औरंगजेबाच्या अंमलाखालील प्रदेशात जाऊन सहीसलामत परत येणं ही अशक्यप्राय वाटणारी कामगिरी महाराजांनी जिंकली. आग्र्यातील मुघल म्युजियमला महाराजांचे नाव दिल्याने पुन्हा त्यांच्या यशाची गाथा लोकांपर्यंत पोहोचेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER