योगी आदित्यनाथ यांचीच नार्को टेस्ट करावी, हाथरस घटनेवरून राष्ट्रवादी आक्रमक

Nawab Malik-Yogi Adityanath

मुंबई : उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरणावर (Hathras Gang Rape,) संपुर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच कॉग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) व कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्याशी उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्कि करण्यावरून तर देशवासी अधिकच संतापले आहेत.

महाराष्ट्रातील मोठे नेतेही या प्रकरणामुळे योगी सरकारवर टीका करत आहेत. त्यातच हाथरस प्रकरणातील उत्तर प्रदेश सरकारने संंबंधित अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट(narco-test) करणाची घोषणा केली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाव मलिक यांनी थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांचीच नार्को टेस्ट करावी, अशा शब्दांत योगीवंवर निशाणा साधला आहे.

उत्तर प्रदेशात अधिकारी आणि पोलीस ज्या पद्धतीने अरेरावीने वागत आहेत. त्याला योगी सरकार बढावा देत असल्याचा आरोप योगींवर होतोय. याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक म्हणाले की, हाथरस प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांची नार्कोटेस्ट जरूर करावी. मात्र हे सर्व अधिकारी योगी आदित्यनाथ यांच्या सांगण्यावरून काम करत होते त्यामुळे फक्त अधिकाऱ्यांची नाही तर योगी आदित्यनाथ यांचीही टेस्ट करण्याची मागणी नबाव मलिक (Nawab malik) यांनी केली आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडीतेवर परस्पर अंत्यसंस्कार केल्याने अनेकांचा प्रसासन आणि सरकारर संशय बळावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER